जीवदया अभियानांतर्गत‘बर्ड कॅम्प’

0
नंदुरबार । येथील श्री जैन यंग अ‍ॅलर्ट गृप ऑफ इंडिया व श्री ज्ञानहंस जैन युवक प्रतिष्ठाणतर्फे मागील आठ वर्षांपासून अभिनव प्रयोग राबविण्यात येत आहे. आतापर्यंत जीवदया अभियान राबवून त्यांनी शेकडो पक्षांचे प्राण वाचविले आहेत.

नंदुरबार शहरात गुजरातप्रमाणे मोठ्या प्रमाणावर पतंगोत्सव साजरा केला जातो. यात वेगवेगळ्या दोर्‍याचा वापर करण्यात येतो. काही पतंगप्रेमी दोर्‍याला मांजा लावून बनवितात. ह्यामध्ये शहरातील मोठ्या प्रमाणात युवक सहभाग घेत असतात. नंदुरबार शहरातील श्री जैन यंग अ‍ॅलर्ट गृप ऑफ इंडिया व श्री ज्ञानहंस जैन युवक प्रतिष्ठाण या गृपचे सदस्य गेल्या 8 वर्षापासून शहरात बर्ड कॅम्प लावून जीवदया अभियान राबवत अभिनव प्रयोग करीत आहे.

पतंगोत्सवाच्या काळात दोर्‍यामुळे जखमी झालेल्या पक्षांवर उपचार करून त्यांना जीवदान देण्याचे कार्य हे युवक करीत आहेत. आतापर्यंत 8 वर्षाच्या काळात त्यांनी शेकडो पक्षांचे प्राण वाचवले आहेत.8 वर्षापूर्वी प.पू.आचार्य युगप्रधान श्री.चंद्रशेखर विजयसिंग महाराज यांची प्रेरणा घेवून या दोन गृपमधील सुमारे 50-60 युवकांनी पतंगोत्सवामुळे पक्षांना नुकसान होऊ शकतो म्हणून 8 वर्षापूर्वीपासून पतंग उडविणे बंद केले आहे.

आता ते मकरसंक्रांतीच्या दिवशी दिवसभर शहरातील जखमी झालेल्या पक्षांना आणून जैन मंदिराजवळ कॅम्पमध्ये त्यांच्यावर उपचार करून दाणापाणी करण्यात येते. दुरूस्त झाल्यानंतर पक्षांना सोडून देण्यात येते. या वर्षी नायलॉन दोर्‍यावरील बंदीमुळे पक्षी जखमी होण्याचे प्रमाण कमी झालेले असल्याची माहिती दिली.

या बर्ड कॅम्पमध्ये वनविभागाचे उपवनसंरक्षक गणेश रणदीवे समवेत वनक्षेत्रपाल मनोज रघुवंशी,वनरक्षक सुनिल करवंदकर, रेखा गिरासे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.राठोड यांच्यासह आकाश जैन,विवेक जैन, वैभव जैन, राजेश जैन,समकित जैन,जयेश जैन, सुरेश जैन,आदी उपस्थित होते. यावर्षी त्यांनी 13 पक्षांवर उपचार केले.

LEAVE A REPLY

*