Type to search

नंदुरबार

मजुरांना घेऊन जाणारी अ‍ॅपेरिक्षा उलटल्याने 9 जण जखमी, बालक गंभीर

Share

बामखेडा । वार्ताहर- शहादा तालुक्यातील वडाळी ते काकर्दा रस्त्यावर मजुरांना घेऊन जाणारी अ‍ॅपे रिक्षा सकाळी 8 वाजेच्या सुमारास उलटून झालेल्या अपघातात 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. एका 8 वर्षीय बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नंदुरबारहुन धुळे येथे हलविण्यात आले आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळी ते काकर्दा या रस्त्यावर अ‍ॅपे रिक्षा (क्र.एम.एच.39,डी. 0075) मजुरांना घेऊन जात असतांना अ‍ॅक्सिलेटर वायर तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा पलटी झाली. यात एकूण 17 मजूर होते. या अपघातात 9 जण गंभीर जखमी असून काही जण किरकोळ जखमी आहेत. यातील मुकाददमचा मुलगा मुकेश हिरामण भिल या 8 वर्षीय मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने नंदुरबार येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथून धुळे येथे हलविण्यात आले आहे.

जखमींमध्ये शिवा भिल (10), प्रकाश भिल (34 ), विलास भिल (16 ), प्रदीप भिल (16), मनराज भिल (20 ), हिराबाई भिल (30), सुखदेव भिल (18), दिलीप मालचे (23), रेखा भिल (19), धनराज भिल (16), कालू भिल (28), किरण बाई (18) यांचा समावेश आहे. काही जण किरकोळ जखमी असून त्यांना प्राथमिक उपचार करुन घरी सोडण्यात आले. सर्व जखमींना मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते तुषार गोसावी, जयेश माळी, गणेश गोसावी, राकेश माळी, विशाल गोसावी, दिनेश बैसाणे, धनराज सोनवणे, पत्रकार सुनील माळी, दिनेश पाटील यांनी सहकार्य केले. या प्रकरणी फिर्यादीवरून सारंगखेडा पोलीस ठाण्यात रिक्षाचालक अजय डोंगर यांच्याविरुध्द भा.दं.वि.कलम 279, 337, 338, मोटार वाहन कायदा कलम 184/187 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनि गणेश न्हायदे, असई संजय बागले,गोविंंद जाधव करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!