Type to search

नंदुरबार फिचर्स

नंदनगरीत पेटली बालाजी वाड्यातील मानाची होळी

Share

नंदुरबार

श्री व्यंकटेश बालाजी संस्थानतर्फे नंदनगरीच्या परंपरेनुसार प्रथम मानाची बालाजीवाडयातील होळी प्रज्वलीत करण्यात आली. त्यांनतर शहरातील शेकडो युवकांनी मशाल पेटवून आपापल्या भागातील होळ्या पेटवल्या.

शहरातील बालाजी वाडयातील श्री व्यंकटेश बालाजी संस्थानच्या होळीला नंदनगरीत प्रथम स्थान आहे. ही होळी प्रज्वलीत झाल्यानंतरच शहरातील विविध भागातून आलेले तरूण मशालीने अग्नीज्योत घेवून जात आपल्या भागातील होळी प्रज्वलीत करतात. बालाजी वाडयाच्या होळीतून प्रज्वलीत मशाल हातात घेत तरूण आपल्या भागाकडे धावत जातात ही परंपरा आजही कायम आहे.

आज सायंकाळी 7 वाजता नंदनगरीतील श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिरासमोर होलिकोत्सवातील सर्व देवी देवतांच्या अवतार मुखवटयाचे विधीवत पुजन महाआरती करण्यात आली.

यावेळी बालाजी संस्थानचे संचालक सारंगबुवा रोकडे व सौ.दिपाली रोकडे यांच्या हस्ते बालाजी संस्थानची होळी प्रज्वलीत करण्यात आली. त्यांनतर शहरातील विविध भागातून आलेले तरूण मशालीने अग्नीज्योत घेवून जात आपल्या भागातील होळी प्रज्वलीत केली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!