Type to search

नंदुरबार

शहादा-शिरपूर रस्ता बनला मृत्यूचा सापळा

Share

किरण सोनार

बामखेडा | ता. शहादा  – सध्या शहादा-शिरपूर रस्ता हा चर्चेचा विषय बनला आहे. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामाबाबत पुर्णताहा दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. संबंधित विभागाकडून या रस्त्यावर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून साईट पट्ट्यांचे काम सुरू होते,मात्र पहिल्याच पावसात साईट पट्ट्याचे तीन तेरा वाजले आहेत.

शहादा-शिरपूर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या दोन-तीन महिन्यांपासून साईट पट्ट्यांचे काम सुरू केले होते,मात्र पहिल्याच पावसात साईट पट्ट्याचे तीन तेरा वाजले आहेत.याबाबत कामात शासनाच्या लाखो रुपयांचा निधी वाया गेला आहे.संबधित विभागाचा चुकीच्या कामामुळे नाहक वाहनधारकांना त्रास होऊ लागला आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे रोजचे अपघात होत आहे.तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामांकडे सर्रास दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे.शहादा शिरपुर हा मार्ग सर्वात जास्त रहदारीच्या असून या मार्गावर पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.त्यामुळे रस्त्यावर खड्डे कि खड्ड्यात रस्ता..? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.रस्त्यात जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचे छोटे-मोठे अपघात नेहमी होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे खड्डे त्वरित बुजविणे गरजेचे आहे.त्यामुळे शहादा – शिरपुर या मार्गावरील खड्ड्यांचे डागडुजी लवकरात लवकर होईल का ? असा प्रश्‍न नागरीकांना पडला आहे.त्यातच या मार्गावरून धावणार्‍या गाड्यांची संख्या देखील जास्त असल्याने यात खड्ड्यांचे स्वरूप दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.वाहनांची वाढती संख्या त्यातच या खड्ड्यांकडे झालेले दुर्लक्ष यामुळे खड्ड्यांची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.शहादा पासून ते कुकावल,कोठली,वडाळी,बामखेडा, तोरखेडा फाटा,हिगणी ते शिरपुर पर्यंत रस्त्यावर जोगो जागी खड्डे पडलेले आहेत.खड्डे टाळण्याचा नांदात वाहनचालकांनडुन नेहमी या रस्त्यावर अपघात घडत असतात.यामुळे वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.मात्र याची जाणीव संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला होत नाही. सदर रस्त्यावरून वाहनचालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

बांधकाम विभागाला डागडुजीला मुर्हुत सापडेना
शहादा ते शिरपुर सदर रस्ता हा ५० ते ५५ कि.मी अंतराचा असून या मार्गवरुन नेहमी शालेय विद्यार्थी विद्यार्थींनी प्रवास करीत असतात.तसेच या रस्त्यावर नेहमी लहान मोठे अपघाताची मालिका नेहमी सुरुच असते तर या रस्त्यावर काही वेळा अपघाताचे मोठे स्वरूप हि घडते व त्यात निंषपाप लोकांना आपले प्राण सुद्धा गमवावे लागत आहेत.तरी देखील संबंधित विभागाला रस्ता दुरूस्ती बद्दलची जाग येत नाही.अजून किती निंषपाप लोकांचे बळी घेण्याचे वाट पाहत आहेत का ? असे अनेक प्रश्न नागरीकांकडुन उपस्थित होते आहेत.का बांधकाम विभागाला रस्त्याचा डागडुजीला मुर्हुत सापडत नाही अशी चर्चा संध्या सार्वजनिक बांधकाम विभागाबद्दल रंगु लागली आहेत.

त्यातच शहादा ते शिरपुर रस्त्यावर काही शेतकर्‍यांनी कोणत्याही प्रकारे परवानगी न घेता रस्ता खोदून पाईपलाईनचे काम करून घेतली आहेत.त्यामुळे सदर रस्त्याचे तीन-तेरा वाजून दिले आहेत.तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. विनापरवानगी रस्ता खोदून काम करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वाहनधारक करीत आहेत.

या महामार्गावर खड्डे बुजविण्याचे काम अद्यापही झाले नसल्याने या महामार्गावर खड्डे मुक्त रस्त्यांचे अच्छे दिन केव्हा येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तसेच यावर्षी शहादा शिरपूर रस्तयावरील खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणाला दिले होते कि नाही.असा मात्र प्रश्न पडतो. शहादा ते शिरपूर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम नेहमी थातुरमातुर पद्धतीने केले जाते. त्यामुळे या रस्त्यावर महिन्याभरातच खड्डे जैसे थे होत असतात.तरी या समस्याचा विचार करून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा कामाला मुर्हुत साधावे व रस्त्याचा डागडुजीचा कामाला गती देऊन सुरवात करावी अशी मागणी सुज्ञ नागरीक करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!