नंदुरबार येथे रविवारी जिल्हास्तरीय अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन

0
नंदुरबार । प्रतिनिधी-नंदुरबार जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने जिल्हास्तरीय अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन दि.30 जुलै रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र अ‍ॅमेच्युअर अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने राज्यस्तरीय सबज्युनिअर, ज्युनिअर व युथ राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन होणार असून या स्पर्धेमध्ये नंदुरबार जिल्ह्याचा संघ सहभागी होणार आहे.

सदर राज्यस्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्याचा संघ सहभागी होणार आहे. त्यासाठी नंदुरबार येथे जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छूक खेळाडूंनी 30 जुलै रोजी सकाळी 9 वाजता उपस्थित रहावे.

या स्पर्धेत 14, 16, 18 व 20 वर्ष आतील मुला-मुलींचे संघ निवड करण्यात येणार असून यात 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर, 5 हजार मीटर, 10 हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेसह गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, लांबउडी, उंचउडी, हातोडाफेक, तिहेरी उडी आदी खेळ प्रकारात प्रथम 3 क्रमांकाच्या खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

14 वर्षाआतील मुले-मुलींसाठी 5 नोव्हेंबर 2003 नंतरचा जन्म असावा. 16 वर्षाआतील मुला-मुलींसाठी 5 नोव्हेंबर 2001 नंतरचा जन्म असावा. 18 वर्षआतील मुला-मुलींसाठी 5 नोव्हेंबर 1999 नंतरचा जन्म असावा. 20 वर्षाआतील मुला-मुलींसाठी 5 नोव्हेंबर 1997 नंतरचा जन्म असावा.

खेळाडूंनी जिल्हा स्पर्धेस येतांना आधारकार्ड, जन्म दाखला सोबत आणावा. अधिक माहितीसाठी स्पर्धा संयोजक मयुर ठाकरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आ.चंद्रकांत रघुवंशी व सचिव प्रा.दिलीप जानराव यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*