नंदुरबारात वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी

0
नंदुरबार । येथील जिल्हा रुग्णालयात 100 विद्यार्थी क्षमतेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच 500 खाटांच्या रुग्णालयालाही आज मंत्रीमंडळाने मंजूरी दिली आहे.

नंदुरबार येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 500 खाटांचे संलग्न रुग्णालय निर्माण करण्याबाबतचे आदेश आज निर्गमित करण्यात आले आहेत. नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रत्यक्षात सुरू होण्यापूर्वी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने नंदुरबार येथील आरोग्य सेवा संचालनालयाच्या अधिपत्याखालील जिल्हा सामान्य रुग्णालय हे नंदुरबार वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे हस्तांतरीत करण्याचे संचालक,

वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांनी प्रस्तावित केले आहे. त्यानुसार नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालय संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्याकडे हस्तांतरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला आहे. नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थी प्रवेश क्षमता 100 निश्चित करण्यात आली असून,

या संदर्भात भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषांची पूर्तता करण्याकरिता या शासन निर्णयासमवेतच्या परिशिष्टामध्ये दर्शविलेल्या कार्यपध्दतीनुसार व अटी शर्तीनुसार, आरोग्य सेवा संचालनालयाच्या अधिपत्याखालील जिल्हा सामान्य रुग्णालय नंदुरबार हे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*