नंदुरबारातील श्रॉफ विद्यालयाने साकारला सौर वीज प्रकल्प

0
नंदुरबार । दि.22 । प्रतिनिधी-येथील श्रीमती हि.गो. श्रॉफ हायस्कूल उत्तर महाराष्ट्रातील पहिली ऊर्जा निर्मिती करणारे सौरशाळा ठरली आहे.
10 के.व्ही. क्षमतेची वीज निर्मिती केली जात असून या पथदर्शी प्रकल्पाचे लोकार्पण विश्वविख्यात अणूशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ.अनिल काकोडकर यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात करण्यात आले.
हवामान बदलातील विपरीत परिणाम अक्षय ऊर्जा निर्मितीवर होणार असल्याची चिंता त्यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्ती केली.
35 सौर तावदाने (सिलीकॉन पॅनेल्स) श्रॉफ हायस्कूलच्या छतावर मांडली गेली असून त्यातून 10 के.व्ही. ऊर्जा निर्मिती यशस्वीपणे केली जात आहे.
संस्थेने स्वखर्चाने या प्रकल्पाला चालना दिली असून शैक्षणिक क्षेत्रातून स्वच्छ वीज निर्मिती करण्याचे पथदर्शी कार्य सुरू केले आहे.

या प्रकल्पाच्या लोकार्पनाप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, संस्थेचे चेअरमन अ‍ॅड.रमणलाल शाह, सचिव डॉ.योगेश देसाई, डॉ.अनिल देसाई, मुख्याध्यापिका सौ.सुषमा शाह, मनिष शाह, डॉ.गजानन डांगे आदी उपस्थित होते.

अणूशास्त्रज्ञ डॉ.काकोडकर यांनी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधत अणूऊर्जा व सौरऊर्जेचे साधर्म्य स्पष्ट केले. ‘क्लीन एनर्जी’च्या उपयुक्ततेबाबत त्यांनी माहिती दिली.

मात्र, ऊजा प्राप्त होवू शकते का? याचाही विचार करण्याची वेळ येवून ठेपल्याचे त्यांनी सांगितले. पृथ्वीवरील वातावरण ढग, धुलीकण व विविध अनैसर्गिक वायुंनी खच्चून भरले आहे.

त्यांच्यामुळे सौरऊर्जा किती प्रमाणात निर्माण होत असेल हे तपासण्याची गरज असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. पर्यावरणाचे संतुलन साधले तरच अक्षय ऊर्जा वाढीस मदत होऊ शकते.

आपल्या स्वास्थ्यावर प्रदुषणाचा परिणाम होत असून ‘योगा’ केल्यानेच शरीर संतुलीत राहील, असा संदेश त्यांनी दिला. शालेय परिसरात नामांकीत देशभक्त वैज्ञानिक उपस्थित राहिल्याने त्यांचे हृद्य स्वागत संस्थेच्यावतीने करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे उपमुख्याध्यापक नानाभाऊ माळी, पर्यवेक्षक राजेंद्र कोळी, सौ.विद्या सिसोदिया यांनी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.गणेश पाटील यांनी केले.

 

LEAVE A REPLY

*