अक्कलकुवा तालुक्यात 15 लाखांचा मद्यसाठा जप्त

0
नंदुरबार । राज्य उत्पादन शुल्क नंदुरबार विभागाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा तालुक्यात 10 ठिकाणी केलेल्या कारवाईत दोन वाहनांसह सुमारे 15 लाख 11 हजार 570 रुपयांचा परराज्यातील अवैध देशी-विदेशी मद्य साठा जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अक्कलकुवा परिसरात अवैध मद्याची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार अक्कलकुवा परिसरात सापळा रचून परराज्यातील अवैध मद्य वाहतुक करणार्‍या पिकअप व्हॅन पकडण्यात आली. सदर कारवाई तळोदा-खापर रस्त्यावर करण्यात आली.अक्कलकुवा परिसरात छापा घालून गोपनिय माहितीच्या आधारावर झडती घेतली असता परराज्यातील अवैध मद्यसाठा मिळून आला. तसेच गोपनिय माहितीच्या आधारावर एका दुकानाची झडती घेतली असता तेथे देखील परराज्यातील अवैध मद्यसाठा केल्याचे आढळून आले.

या कारवाईत पंजाब राज्यात निर्मित व अरुणाचल राज्यात विक्रीसाठी असलेले तसेच महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेले गेम चेंज व्हिस्कीच्या एकुण 234 बॉक्स (11232 पेट बाटल्या, 180 मिली ), बिअरचे एकुण 11 बॉक्स (650 मिली प्रमाणे 132 बाटल्या) व देशी दारु टॅन्गो पंच तीन बॉक्स (180 मिली प्रमाणे, 144बाटल्या) व मद्यवाहतूक करणारे वाहन महिंद्रा पिकअप वाहन(एम.एच.04-डि.एस 9058) मधुन वाहतुक करित असता वाहन चालकाच्या ताब्यातून जप्त करण्यात आले आहे.

सदर कारवाई शुभम जगदीश राजपूत, पविन सुदाम चौधरी, जयेश सुरेश चौधरी, कदन मधुकर चौधरी, सर्व रा.नंदुरबार, मनोज लक्ष्मण पाडवी रा.खांडबारा ता.नवापूर, माणिक शिरसाठ, कृष्णा चौधरी रा.अक्कलकुवा, सुनिल तडवी रा.तळोदा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईत आरोपींच्या ताब्यातून 2 वाहनासह एकुण सुमारे 15 लाख 11 हजार 570 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींवर मुंबई दारुबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सदर कारवाई विभागीय उपायुक्त नाशिक विभाग प्रसाद सुर्वे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क,नंदुरबार मोहन वर्दे, अधीक्षक धुळे डॉ.मनोहर अंचूळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महाडीक, व्ही.बी.पवार, प्रकाश गौडा, प्र.निरीक्षक मनोज संबोधी, दुय्यम निरीक्षक शैलेंद्र मराठे, क्षिरसागर, गायकवाड, अतुल शिंदे, स.दु. नि. भट्टाचार्य बागले, वहाडे, धनराज पाटील, देवरे, वाघ, प्रशांत पाटील, जाधव, बोरसे, अजय रायते, हितेश जेठे, राजेंद्र पावरा आदींनी केली.

LEAVE A REPLY

*