आयशरची मोटारसायकलला धडक : बाप-लेक ठार

0
अक्कलकुवा । नेत्रग – शेवाळी राष्ट्रीयमार्गावर नयन शेवडी ता. अक्कलकुवा फाट्याजवळ परप्रांतातून मजुरी करून मोटारसायकलने होळी साठी घराकडे परत येत असतांना आयशरने धडक दिल्याने 11 महिन्याच्या मुलींसह पिता अपघातात जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली.याप्रकरणी अक्कलकुवा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन चालकाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश शिंगा नाईक ( वय 25 ), हे आपली पत्नी अनिता गणेश नाईक व मुलगी तनवी ( वय 11 महिने) सर्व रा. केलवापाणी ता. तळोदा यांच्या सह गुजरात राज्यातील अंकलेश्वर परिसरात ऊस तोडणीच्या कामासाठी गेले होते, आज दि.24 रोजी आपल्या परिवाराला घेऊन हिरोहोंडा स्प्लेन्डर प्रो मोटारसायकलने (क्र. एम. एच. 39 के. 8002) होळी सणानिमित्त आपल्या मुळगावी केलवापाणी ता. तळोदा याठिकाणी परतत असतांना अक्कलकुवा ते खापर गावा दरम्यान असलेल्या नयनसेवडी गावाच्या फाट्याजवळ मोटारसायकलच्या मागुन येणार्‍या आईशर टेम्पो (क्र. जी. जे. 06 ए. व्हि. 7151) हिने मागाहून ठोस दिल्याने ते जमिनीवर पडले व मोटारसायकल वरून असलेल्या गणेश सिंगा नाईक यांच्या अंगावरून आईशरचे पुढचे चाक गेल्याने त्यांचा मृत्यु झाला 11 महिन्यांची चिमुकली तनवी हीदेखील जागेवर ठार झाली,

त्यांच्या समवेत असलेल्या अनिता गणेश नाईक हिच्या पायाला दुखापत झाली असून पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा येथून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. मयत पिता व मुलगी हिच्यावर ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले होते, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

याप्रकरणी आईशर टेम्पोवरील चालक सलीम मुस्त्याकखान पठाण रा. नवायार्ड, लुकसेड रोड, रसुल चाळ बरोडा ( गुजरात ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान सदर घटणेचा तपशील देण्यासाठी पोलीस टाळाटाळ करत होते.

LEAVE A REPLY

*