बनावट मद्याचा कारखाना उद्ध्वस्त

0
अक्कलकुवा । दि.1 । प्रतिनिधी-तालुक्यातील जुने वाण्याविहीर येथे एका घरात बनावट मद्य तयार करण्याचा कारखाना अक्कलकुवा पोलीसांनी उध्वस्त केला.
यात 1 लाख 58 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन तीघांना अटक करण्यात आली आहे.

तालुक्यातील जुने वाण्याविहीर येथील भरत सिंगा वळवी यांच्या राहत्या घरात बनावट कद्य कारखाना सरू असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांना मिळाली.

पोलीसांनी दि.1 जुलै रोजी पहाटेच्या 5.30 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक डांगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, हवालदार शशिकांत नाईक, सुनिल पाडवी, प्रविण पटेल, कन्हैय्या परदेशी, महिला पोलीस प्रिती वसावे यांनी धाड टाकून बनावट मद्य कारखाना उध्वस्त करून स्पीरीटसह बनावट मद्य 1 लाख 58 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

पोलीस शिपाई अविनाश रंगारे यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात आरोपी भरत सिंगा वळवी, कैलास भरत वळवी, अरविंद भिमसिंग वळवी सर्व रा.जूने वाण्याविहीर यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास हे.कॉ. राम वळवी करीत आहेत.

पोलीसांच्या या कारवाईमुळे तालुक्यातील बनावट मद्यविक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून यापुढे बनावट मद्य तयार करणार्‍यांविरूद्ध धडक मोहिम राबविण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*