आदिवासी गौरवदिनी ग्राममहोत्सव करावा – वळवी

0
बोरद ता. तळोदा । वार्ताहर-आदिवासीच्या अस्तित्व अस्मितेची जाण होऊन समाजात जागृती व्हावी म्हणून आदिवासी समन्वय परिषद वतीने कार्य सुरू आहे दि 9 ऑगष्ट आदीवासी क्रांति दिन हा गावपाड्यात ग्राम महोत्सव दिन म्हणून साजरा व्हावा आपापल्या गावातच प्रभात फेरी, क्रांतिवीरांची प्रतिमा पूजन, व प्रबोधन व मार्गदर्शन आदी विविध कार्यक्रम आयोजन करून ग्राम महोत्सव साजरा करण्यात यावे असे आवाहन आदिवासी समन्वय परिषदचे अध्यक्ष सतीश वळवी यांनी केले आहे

आदिवासी ओळ्ख असलेला नंदुरबार जिल्हा असून तमाम सर्व क्षेत्रातील आदिवासी बांधवानी दि 9 ऑगष्ट आदिवासी क्रांती दिन हा ग्राम महोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी संकल्प करावा क्रांतिवीर बिरसामुंडा व खाज्या नाईक तसेच अन्य वीरांनी समाजाप्रती त्याचे कार्य व प्राणाची आहुती दिली आशा वीरांना स्मरण करणे, त्यांच्या प्रतिमेची पूजन करणे, भविष्य पिढीला आठवण करून देणे, त्यांचे विचार ध्येय आदर्श घेऊन आजची बदलेली वास्तविकतेवर मात करण्यासाठी सामाजिक समन्वयता साधने काळाची गरज आहे .

समाज बांधवांनी स्वतः समजणं, स्वतः सांभाळणं, स्वतः सुधरणं असे त्रिसूत्री अंगिकरण असावे, प्राथमिकता आपल्या पासून सुरुवात करावी म्हणून आदिवासी क्रांती दिन ग्राममहोत्सव म्हणून साजरा करावा दि 9 रोजी सकाळी 7 ते 9 वाजे दरम्यान गावात प्रभात फेरी काढावी, वीर हुतात्म्यांचे प्रतिमा पूजनकरणे, मुलांचे आदीजन गीत व वीर हुतात्मा विषयी प्रबोधन व मार्गदर्शन कर्यक्रम नंतर सार्वत्रिक सामाजिक प्रतिज्ञा व समारोप करणे जिल्ह्यातील गांव प्रतिष्टीत, गांवकरभारी, महिलावर्ग, युवकयुवती, बालस्नेही मित्र, सर्वांनी एकत्र येऊन आदिवासी क्रांतिदिन ग्राम महोत्सवा मध्ये सहभागी व्हावे आपल्याच गांवात हा कार्यक्रम आयोजन करावे असे आवाहन आदिवासी समन्वय परिषद अध्यक्ष सतीश वळवी यांनी पत्रकान्वये केले

 

LEAVE A REPLY

*