Type to search

नंदुरबार

कढेल गावाजवळ रिक्षा उलटली; 20 मजूर जखमी

Share

मोदलपाडा । वार्ताहर – तळोदा तालुक्यातील कढेल गावादरम्यान, मजूर घेऊन जाणारी टाटा मॅजिक रिक्षा रस्त्यावर अचानक उलटली असून, 20 मजूर त्यात जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तळोदा तालुक्यातील मोड-पुनर्वसन येथून 20 ते 30 मजूर दररोज प्रमाणे कढेल जवळील शेतकरीच्या शेतात कापूस निंदणी साठी जात असतात. सदरील रिक्षाचालक येथील मजुरांना सकाळी 8 च्या सुमारास दररोज शेतामध्ये सोडून आला होता. दुपारी 1 च्या सुमारास काम पूर्ण झाल्याने मजूरांना घरी नेत असतांना अचानक आलेल्या वेगवान वार्‍यामुळे चालकाचे संतुलन बिघडल्याने, रिक्षाचालकाचा वाहनावरील नियंत्रन सुटल्याने अपघात घडला. त्यात 20 ते 30 मजूरांना दुखापत झाली.

सदरील घटना मोड-कढेल गावातील नागरिकांना कळताच, 108 वर फोन करून रुग्णवाहिकेला बोलविण्यात येवून लागलीच तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यातील काहींची स्थिती गंभीर असून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत पोलीस प्रशासनाला कळताच घटनास्थळी भेट देऊन सदरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमलाड-बोरद रस्त्यावर दिवसेंदिवस अपघातांची मालिका सुरूच आहे. सदरील रस्त्यावर अनेक अपघात होत असून अनेक नागरिकांचा जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे सदरील रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!