Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारअज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

तळोद्याहुन नंदुरबारकडे येणार्‍या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी, तळोद्याहुन नंदुरबारकडे हर्षल माधव गुरव (31) रा.सदिच्छा नगर,धुळे त्याच्या मोटारसायकलने(एम.एच.18.ए.जी.4354) येत असतांना धमडाई फाटयाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली.

या अपघातात तो जखमी झाला.त्याला तातडीने नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथुन पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले.

दरम्यान उपचार सुरू असतांना त्याचे निधन झाले.याप्रकरणी विनायक भास्कर गुरव रा.गांधीनगर,नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोनि. भापकर करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या