Type to search

नंदुरबार

कंटेनरची पिकअपला धडक,एक ठार दोन जखमी

Share

नंदुरबार | तालुक्यातील पथराई शिवारात असलेल्या श्रीकृष्णनगर वसाहती समोर कंटेनरने बोलेरो पिकअप ला जोरात ठोस मारल्याने या अपघातात पिकअप चालकाचा मृत्यू झाला असुन दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नंदुरबार तालुक्यातील पथराई शिवारात असलेल्या श्रीकृष्णनगर वसाहती समोर आरोपी नाने राम गंगाराम गुजर याने त्याच्या ताब्यातील टाटा कंटेनर (क्र.आर.जे ०६,जी.सी.२५७३) भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरून येणार्‍या बोलेरो पिकअप मालवाहू गाडीला (एम.एच. ०४,एफ.डी.६७७५) जोराची ठोस मारली.

या अपघात पिकअप वरील चालक विजेंद्र सत्कार मोरे (२८) रा.सुंदरर्दे, ता.जि.नंदूरबार यांचा मृत्यू झाला. तर पिकअप मध्ये बसलेले रोहित शांतीलाल वसावे, सुपिल चुनीलाल वसावे दोन्ही रा.नारायणपूर ता.जि. नंदूरबार यांना दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय धुळे येथे दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी आरोपी याने अपघातानंतर पोलीस ठाण्यात खबर न देता पळून गेला म्हणून पोहेकॉ कैलास सोमनाथ मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नानेराम गंगाराम गुजर रा.रघुनाथपुरा(जि. बलवाडा,राजस्थान) याच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सजन वाघ करीत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!