Type to search

maharashtra नंदुरबार

नंदुरबार-नाशिक बसला अपघात; चार प्रवाशांचा मृत्यू; 15 जखमी

Share
नंदुरबार, । नंदुरबार- नाशिक एसटी बसचा मंगळवारी दुपारी भावडबारी-देवळा मार्गावर भीषण अपघात झाला आहे. एसटी बसने कंटेनरला धडक दिली असून या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 15 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर देवळा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नंदुरबार-नाशिक एसटी बस (क्र.एम.एच.20-बी.एन.2310) सकाळी 8.45 वाजेला नंदुरबार आगारातून नाशिककडे रवाना झाली. भावडबारी घाटातून जात असतांना समोरुन येणार्‍या कंटेनरने बसला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की बस आणि कंटेनरच्या एका बाजूचा पूर्णपणे चुराडा झाला.

चांदवडजवळील भावडबारीत नाशिक-नंदुरबार बसला झालेल्या अपघातात चारजण ठार झाले असून वीसहून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांपैकी राहुल राजाराम देवरे (वय23) व दिपक कुलकर्णी (45,चित्तळवेढे,ता.अकोला) यांची ओळख पटली आहे. जखमींवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरु आहे.

खाजगी डॉक्टर तसेच स्थानिकांची मदत घेण्यात येत आहे. या अपघाताची तीव्रता मोठी होती. या अपघातात भटू बहिरे (55,छडवेल साक्री), कृष्णा महाले (40), गणेशपूरपिंप्री), चाळीसगाव), हिरामण साठे (63,आरकेनगर,सटाणा), निलेशकुमार वळवी (20,गुलबी बग्गा,अकक्लबुवा), हसरूद्दीन पिंजारी (31,नंदुरबार-बसवाहक) हे पाच जखमी झाले. त्यांना मालेगाव सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

अपघाताचे वृत्त समजताच स्थानिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतांमध्ये दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश असल्याचे समजते. घटनेची माहिती कळताच नंदुरबार येथील आगारप्रमुख निलेश गावीत यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!