अंबापूर येथील कृषी विद्यालयातर्फे शेतकर्‍यांना मार्गदर्शन

0
नंदुरबार । दि.19 । प्रतिनिधी-महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालय नदुरबार येथील कृषिदूतांनी अंबापूर येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कृषिदूत विशाल पाटील, चेतन पाटील, धिरज कदम, विनोद बागुल, सागर बारेला, अक्षय गाडे हे शेतकर्‍यांना माती परिक्षण, बीज प्रक्रिया, खतांचा योग्य वापर, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, निंबोळी अर्क, घरच्या घरी तयार करण्याची पद्धत आदी विषयांवर मार्गदर्शन केले.

कांदा, कापूस, मका, मिरची ही पिके प्रामुख्याने घेत असल्याने कमी खर्चात जास्त उत्पादन मिळविण्यासाठी विद्यापीठाच्या नवीन तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने कृषिदूत जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे.

परिसरातील शेतकर्‍यसांना पाणी व्यवस्थापन, रोग किडीची ओळख व नियंत्रणाविषयी माहिती करून दिली. कार्यक्रमास सरपंच पूनम बागुल, अशोक गायकवाड, उत्तम सूर्यवंशी, माजी सरपंच श्यामू चौरे, भरत बागुल, भिलीबाई बागुल, ग्रामसेवक सी.व्ही. ठाकरे, कृषी सहाय्यक जितेंद्र धगधगे, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*