कृषी सहाय्यक संघटनेतर्फे 27 ला निदर्शने

0
नंदुरबार । दि.23 । प्रतिनिधी-कृषी विभागाच्या आकृतीबंध तयार करण्यात यावा कृषी पर्यवेक्षकांची पदे त्वरीत भरण्यात यावीत यासह इतर मागण्यांसाठी कृषी सहाय्यक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषी सहाय्यकांनी साखळी उपोषण केले.
कृषी सहाय्यकांनी आपल्या मागण्यांकरीता विविध टप्यात आंदोलन सुरू केले असून साखळी उपोषण हे आंदोलनाचा हा चौथा टप्पा पूर्ण झाला. दि.27 जून रोजी सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्यावतीने नंदुरबार जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, ाज्य शासनाने स्वतंत्र मृद व जलसंधारण विभागाची स्थापना केली आहे.

त्याबाबत निर्णय 31 मे 2017 रोजी निर्गमित करण्यात आला. या विभागात कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्ग करण्यात येणार आहेत.

मृद व जलसंधारण विभागाने कृषी सहाय्यकास पदोन्नतीने कृषी पर्यवेक्षकांची सर्व पदे वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात कृषी सहाय्यकांनी पदोन्नतीला पद राहणार नाही.

कृषी विभागामध्ये बहुतांशी पदे रिक्त आहेत. यामुळे उर्वरीत कर्मचार्‍यांवर कामाचा ताण वाढणार आहेत. त्यासाठी कृषी विभागाच्या सुधारीत आकृतीबंध त्वरीत तयार करण्यात यावा. हा आकृतीबंध तयार करीत असतांना महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेस सहभागी करून घ्यावे, कृषी सहाय्यकांमधून कृषी पर्यवेक्षकांनी पदे 100 टक्के पदोन्नती भरण्यात यावीत, अधिकार्‍याप्रमाणे कृषी पर्यवेक्षकांची पदे भरण्यात यावीत, सुधारीत आकृतीबंधामध्ये कृषी सहाय्यकांचे पदनाम सहाय्यक कृषी अधिकारी असे करण्यात यावे आदी मागण्यांसाठी नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषी सहायकांनी साखळी उपोषण केले.

कृषी सहाय्यकांनी विविध टप्यात आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा हा चौथा टप्पा असून दि.27 जून रोजी राज्यातील प्रत्येक विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

*