नवापूर चौफुलीवर आदिवासी बांधंवाचा रास्तारोको

0
नंदुरबार । प्रतिनिधी-नंदुरबार शहरातील नवापूर चौफुलीवर असलेल्या क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ आज नवापूर चौफुलीवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. मालती वळवी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
शहरातील बंधारपाडा व भिलाटी परिसरातील आदिवासी युवक या रास्तारोको आंदोलनात मोठया संख्येने सहभागी झाले होते.

या रास्तारोको आंदोलनामुळे काहीकाळ वाहतुक विस्कळीत झाली होती. आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी तातडीने घटनास्थळी जावून आंदोलकांशी चर्चा केली व लवकरच हा पुतळा दुरूस्त करण्यात येईल व घटनेची चौकशी केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.

तूर्त न.पा. प्रशासनास पुतळा झाकून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. यावेळी पोलीस उपअधिक्षक रमेश पवार यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता व आंदोलकांना शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

LEAVE A REPLY

*