नऊ ऑगस्टला राज्यात आदिवासीदिन साजरा होणार

0
नंदुरबार । दि.1 । प्रतिनिधी-राज्यभरात 9 ऑगस्ट हा आदिवासी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने घेतला आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण आमसभेच्या ठरावावर 9 ऑगस्ट हा दिन जागतिक आदिवासी दिन म्हणून जाहिर करण्यात आला आहे. त्यानुसार जगभरात 9 ऑगस्ट हा दिन जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखाली सर्व शासकीय/अनुदानित आश्रमशाळा, विद्यालय, कनिष्ठट महाविद्यालय, महाविद्यालय, इंग्रजी मॉडेल स्कुल, एकलव्य निवासी पब्लिक स्कुल, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अपर आयुक्त, आदिवासी विकास कार्यालय, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालय, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ कार्यालय, शबरी आदिवासी वित्त व विकास महामांडळ कार्यालय व आयुक्त, आदिवासी विकास कार्यालय या ठिकाणी 9 ऑगस्ट हा दिन जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असा निर्णय राज्य शासनाने आज घेतला.

आदिवासी दिनाचे आयोजन करण्यासाठी राज्यस्तरावर व प्रकल्प स्तरावर समित्यांचे गठन करण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

*