सहा ऑगस्टला बंजारा समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव

0
नंदुरबार । दि.29 । प्रतिनिधी-भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेच्यावतीने बंजारा समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ दि.6 ऑगस्ट रोजी आयोजीत करण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष करण चव्हाण व जिल्हा सचिव मोरसिंग राठोड उपस्थित राहणार आहेत. सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात दहावीत 70 टक्के व 12 वीत 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे.

तसेच सेवानिवृत्त कर्मचारी, पुरस्कारप्राप्त कर्मचारी, पदोन्नती कर्मचारी, पदवीप्राप्त केलेले विद्यार्थी यांचा गौरव करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांसह सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे नाशिक विभागीय अध्यक्ष हिंमत राठोड, विभागीय सचिव प्रा.संजय जाधव, नंदुरबार जिल्हाध्यक्ष करणसिंग चव्हाण, सचिव मोरसिंग राठोड, जिल्हा कोषाध्यक्ष अतिष चव्हाण, प्रमोद जाधव, रामजी राठोड, छोटू राठोड, रामू चव्हाण, राजूसिंग पवार, जितेंद्र चव्हाण, गजानन चव्हाण, प्रा.दुर्योधन राठोड, रंजीत राठोड, ज्ञानेश्वर राठोड, सुपडू राठोड, धारा राठोड, लक्ष्मण चव्हाण, कैलास पवार, बिरजू चव्हाण, हरीष खसावद, दशरथ चव्हाण, छाया पवार, सुनिला चव्हाण आदींनी केले आहे.

हा कार्यक्रम शहादा येथील वसंतराव नाईक क्रीडा संकुल येथे सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती नंदुरबार जिल्हाध्यक्ष करणसिंग चव्हाण यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

*