15 ऑगस्टपासून नागरिकांना मिळणार ऑनलाईन सातबारा

0
नंदुरबार । दि.01 । प्रतिनिधी-1 ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्राल महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन संगणकीकृत 7/12 देण्याचा संकल्प केला असून 1 ऑगस्टपासून राज्यभर याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठयांनी ऑनलाईन सातबारा कसा काढावा याबाबत प्रात्यक्षिक करुन दाखवले.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी म्हणाले, सातबारा संगणकीकरणाच्या कामात नंदुरबार जिल्हा सद्यस्थितीत नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर आहे.
जिल्ह्यात एकूण 36 मंडळ भागात 219 सजा तर एकूण 885 महसूली गावे आहेत. या सर्व गावामध्ये संगणकीकृत सातबाराचे चावडी वाचन करण्यात आले आहे.

त्यातील आढळून आलेल्या चुका दुरूस्त करण्याचे काम व त्याचबरोबर खाता मस्टर दुरूस्ती 1 ते 26 अहवाल निरंक करणे आदी कामे अंतिम टप्यात आहेत.

याप्रमाणे तयार झालेले सातबाराची महसूल अधिकर्‍याकडून पुन्हा 100 टक्के तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमुळे अचूक 7/12 तयार होणार आहे. हा 7/12 शासनाच्या ारहरलर्हीश्रशज्ञह.ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

प्रमाणीत प्रत घेण्यासाठी आपले सरकार पोर्टलचा वापर करावा. ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेसाठी जिल्ह्यातील 42 महाईसेवा केंद्राद्वारे ऑनलाईन 7/12 उपलब्ध करून दिला जाईल.

या महत्वाकांक्षी कार्यक्रमामुळे शेतकर्‍यांना 7/12 उतारा सहन उपलब्ध होणार असल्यामुळे त्यांचा वेळ व श्रम वाचणार आहे. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतीमान होण्यास मदत होणार आहे.

1 ते 15 ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रम घेवून तलाठी सझा, तहसिल उपविभाग त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय व विविध स्तरावर 7/12 संगणकीकरणाबाबत मोठया प्रमाणात जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

दि.15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते संगणकीकृत 7/12 वितरणाचा शुभारंभ केला जाणार आहे. पुढील 15 दिवसामध्ये सर्व तलाठी, मंडळ अधिकारी यांनी आपल्या सझामध्ये 7/12 संगणकीकरणाला व्यापक प्रमाणामध्ये प्रसिध्दी द्यावी तसेच लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मुख्यालयी उपलब्ध रहावे.

नागरीकांनी संगणकीकृत ऑनलाईन 7/12 घ्यावा, आपल्या अडचणीचे निरसन करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अप्पर जिल्हाधिकारी व सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तलाठी यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे नंदुरबार जिल्ह्याला हे साध्य करता आले.

याबाबत जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अभिनंदन केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अनिल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, उपजिल्हाधिकारी अजित थोरबोले, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी जैन आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*