प्रवचनाद्वारे स्वच्छतेचा महाजागर

0
नंदुरबार । पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग व वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांचे संयुक्त विदयमाने दि.26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्राच्या स्वच्छतेचा महाजागर कार्यक्रम राबविण्यात येत आहे.त्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद नंदुरबार यांचे वतीने जिल्हयातील प्रवचनकार यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती.

स्वच्छ भारत मिशन आणि वारकरी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.बी.सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठक जिल्हा परिषदेच्या सभागृहात ह.भ.प नरहर बुवा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सारीका बारी,ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज माळी, ह.भ.प. नामदेव शास्त्री महाराज, ह.भ.प.डॉ.भोजेंद्र महाराज शिंदे, ह.भ.प.शुभम महाराज मंदाणेकर, ह.भ.प.पावबा महाराज वैंदाणेकर. ह.भ.प.आदेश महाराज प्रकाशेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सारीका बारी यांनी केले. यावेळी उपस्थित प्रवचनकार यांना मार्गदर्शन करताना ह.भ.प नरहर बुवा चौधरी म्हणाले की, येत्या 26 जानेवारी पासून प्रवचनाच्या माध्यमातून जिल्हयात स्वच्छतेचा जागर घालण्यात येणारआहे.

विशेत: शाळास्तरावर विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी रुजविण्यासाठी हे विशेष अभियान राबविले जाणार आहे. सद्यस्थितीत समाजात स्वच्छता,आरोग्य,पाणी,प्रदुषण यासारख्या समस्या निर्माण होवून निसर्गाचा समतोल ढासळला आहे. यामुळे भविष्यात मानवी अस्तित्वच धोक्यात आले असून ती परिस्थिती उदभवू नये यासाठीच वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून संतविचारांच्या सहाय्याने प्रबोधन करण्यासाठी या महाजागरात प्रवचनाच्या माध्यमातून जाणीवजागृती करावी असे आवाहनही ह.भ.प नरहर बुवा चौधरी यांनी यावेळी उपस्थितांना केले. सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार सुनिल पाटील यांनी मानले.

महाराष्ट्राच्या स्वच्छतेचा महाजागर कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हास्तरावरुन दिनांक 26 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हयातील सर्व शाळा व गावांमधून स्वच्छतेच्या प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यामध्ये शाश्वत स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, ओला आणि सुका कचरा वर्गीकरण, शौचालयाचा नियमित वापर तसेच प्लास्टीक बंदी व परिसर स्वच्छता याविषयी गावा-गावात जागर घातला जाईल.

LEAVE A REPLY

*