कामगारांच्या हक्कासाठी शिवसेना नेहमी पाठीशी राहील! – डॉ.विक्रांत मोरे

0

नंदुरबार । हिंदुह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होवून महाराष्ट्र एस.टी.कामगार सेना कार्यरत आहे. कामगारांच्या हक्कासाठी शिवसेना नेहमी पाठीशी राहील असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे यांनी केले.

नंदुरबार आगारात महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेचे फलक अनावरण आणि शाखा उदघाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश अहिरे होते. महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेतर्फे प्रमुख मान्यवरांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतिषबाजी करीत स्वागत करण्यात आले. नंदुरबार आगारात आयोजित मेळाव्यात फलक अनावरणानंतर मान्यवरांच्या हस्ते याहामोगी माता,छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

कामगार सेना मेळाव्यात उपस्थित वाहक,चालकांनी सदैव कामगारसेने सोबत राहण्याची ग्वाही दिली. यावेळी जिल्हा कार्यकारीणी निवडण्यात आली. यात अध्यक्षपदी डॉ.विक्रांत मोरे,उपाध्यक्ष- संतोष गावित,दिनेश सोनार,संघटक-गोकुळ जाधव,सचिव राकेश बेडसे, सहसचिव रविंद्र येलवे,

कार्याध्यक्ष विजय चौधरी,खजिनदार संजय सोनवणे,एस.पी. कुलकर्णी,चालक प्रतिनीधी ए.एस.मराठे,वाहक प्रतिनीधी एस.व्हि.कुवर,आदिंसह कर्मचारर्‍यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमास प्रविण गुरव,किरण पाटील,राजु भावसार,प्रशांत परदेशी,बापु ठेगडे, विश्वास मालचे आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सुनिल कुलकर्णी,बी.जी.बागुल,गुलाब पाटील,व्हि.एस.हिवंत,बापु वळवी,किशोर वळवी,शालीग्राम कुवर यांनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*