सन्मित्र क्रीडा मंडळाकडून केरळ पूरग्रस्तांना 21 हजाराची मदत

0

शहादा । ता.प्र. – केरळला पावसाचा मोठा तडाखा बसल्याने केरळला देश विदेशातून मदतीचा ओघ सुरू आहे. शहादा येथील सन्मित्र बहुउद्देशिय क्रीडा मंडळाने 21 हजार रूपयांचा निधी शहरातील नागरिक, व्यापारी, कर्मचार्‍यातर्फे गोळा करण्यात आला.

त्यासाठी शहरातून मदतफेरी आयोजित करण्यात आली होती. या मदतफेरीत प्रा.ज्ञानी कुलकर्णी, प्रा.संपत कोठारी, प्रतिमा माळी, प्रा.आर.टी.पाटील, रोहन माळी, समीर जैन, प्रतिभा बोरसे, अ‍ॅड.गोविंदभाई पाटील, प्रा.लियाकतअली सैय्यद, राष्ट्र सेवा दल शहादा कार्याध्यक्ष माणकभाई चौधरी, सैय्यद अतहरअली, शेख कय्युम, ताराबाई बेलदार, मायाबाई जोहरी, ललिता राठोड, विजया पाटील, वृषाली भावसार, सुनंदा तांबोळी, संध्या विसपुते, सुनिता पाटील, पायल डोडवे, चंद्रकला पाटील, आदिंनी सहभाग घेतला. लहान मोठे व्यापारी, फेरीवाले, रिक्षाचालक, टेम्पोचालक आदींनी मदत निधीत पैसे दिले.

शहादातील महावीर इग्लिश स्कूल, व्हॉलंटरी प्राथमिक शाळा, लाडकोरबाई प्राथमिक शाळा, विकास प्राथमिक शाळा, व्ही.के.शहा हायस्कूल, सर सैय्यद उर्दू शाळा, म्युनिसिपल हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी खाऊचे पैसे स्वेच्छेने मदत निधीला दिले.

सदर निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे बँक ड्राफ्ट बनवून सुपूर्त केला जाणार आहे. सन्मित्र क्रीडा मंडळ दरवर्षी विविध भारतीय क्रीडा स्पर्धा आयोजनाबरोबर आदर्श शिक्षकांना पुरस्कार, आपत्ती काळात आर्थिक मदत, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे आदी उपक्रम राबवत असते, असे मंडळाचे अध्यक्ष प्रा ज्ञानी कुलकर्णी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*