नवानगर भाजपा मेळाव्यात जुन्या-नव्या कार्यकर्तेमध्ये वाद

0
शहादा । ता.प्र.- शहादा तालुक्यातील नवानगर येथे भारतीय जनता पक्षाच्या आदिवासी जनजाती प्रकल्पांतर्गत कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील समस्या आ.विजयकुमार गावीत यांच्या समोर मांडल्या. त्यास समाधानकारक उत्तर देण्याऐवजी अपमानस्पद भाषा वापरल्याने डॉ.गावित व कार्यकर्त्यांमध्ये जुने व नवे कार्यकर्ते असा वाद उफळून आला. या घटनेचा परिसरातील ग्रामस्थांनी निषेध केला आहे.

शहादा तालुक्यातील नवानगर येथे दि.8 रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास खा.डॉ.हिना गावित यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी जनजाती प्रकल्प विभाग व महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. काही कारणास्तव खा.डॉ.हिना गावित या मेळाव्यास अनुपस्थित राहील्या. त्यांच्या पश्चात आ.डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हा परिषद सदस्य सुनिल चव्हाण यांच्या उपस्थितीत हा मेळावा घेण्यात आला.उपस्थित कार्यकर्त्यांना प्रकल्पाची माहिती देण्यासोबत आ.डॉ.गावितांनी उपस्थितांना तुमचे काही प्रश्न असल्यास त्या मांडा असे सांगितल्यानंतर ओझट ता.शहादा येथील पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आमदारांना सांगितले की,

गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या परिसरातील नागरिकांना रेशनकार्ड मिळाले नाही. याबाबत अनेक वेळा अनेक पदाधिकार्‍यांकडे पाठपुरावा केला. मात्र त्यास यश आलेले नाही. प्रत्येक बैठकीत निवेदन देतो मात्र या समस्येवर अद्यापही उपाययोजना झालेली नाही. वारंवार केवळ आम्हाला आश्वासन दिले जाते.या विषयावरूण वाद वाढल्याने डॉ.गावीत भडकले. या कारणावरूण डॉ.गावित व उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दीक चकमक झाली. अचानक परिसरातील सर्वात ज्येष्ठ कार्यकर्त्याचा अपमान केल्याने परिसरातील ग्रामस्थांनीही डॉ.गावितांच्या या भुमिकेचा निषेध व्यक्त केला. भाजपाच्या खासदार आमदार असल्याने त्यांनी कार्यकर्त्याच्या भावना जाणून घेतल्या पाहिजे मात्र असे न करता आमदारांनी कार्यकर्त्यांचीच लायकी काढल्याने कार्यकर्त्यांनी आमदारांचा जाहीर निषेध केला आहे.

आ.डॉ.गावित राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात आले असले तरी त्यांच्या भाषेत काहीही बदल झालेला नाही अशी भावना यावेळी परिसरातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

आ.डॉ.गावित यांच्या व्यासपीठावर सातत्याने राष्ट्रवादीवादी पदाधिकार्‍यांचा वावर असतो. सातत्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा संघर्ष होत असतो. नवे जुने, निष्ठावान अनिष्ठावान असा वाद गेल्या साडे चार वर्षापासून शहादा तालुक्यात सुरु आहे. त्यातच नवानगर येथे पक्षाच्याच कार्यक्रमात अशी घटना घडल्याने हे वादाचे प्रकार आमदारांचा पिछा सोडीत नाही असे कालच्या घटनेवरुन स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

*