उत्सवात सद्भावनेला महत्त्व

0
नंदुरबार । नंदुरबार गणपती उत्सव साजरा करतांना मंडळांनी समाज उपयोगी उपक्रम राबवून जनतेमध्ये चांगला संदेश द्यावा, त्याचबरोबर पर्यावरणाचा र्‍हास होणार याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाचा बिरसामुंडा सभागृहात शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपविभागीय अधिकारी श्रीमती वान्मती सी,अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार व शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी पुढे म्हणाले की, उत्सव साजरा करताना प्रशासनातील अधिकार्‍यांनी दिलेल्या जबाबदार्‍या योग्यरित्या पार पाडाव्यात. गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी गणेश उत्सवाच्या कालावधीत रक्तदान शिबिरे, आरोग्य, स्वच्छता, जलसंधारण, पर्यावरण, याबाबत कार्यक्रम घ्यावेत असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील म्हणाले की, गणेश मंडळांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करावेत व जास्तीत जास्त मंडळांनी सीसीटीव्ही बसवावेत ,देखाव्यात जनजागृतीचे पोस्टर लावावेत यामुळे चांगले प्रबोधन होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच गणेश उत्सव कालावधीत काही समाजकंटक कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे काम करतात प्रामुख्याने मॉब लिंकिंग, फसवणूक, छेडखानी असे प्रकार होत असल्याने जनतेच्या लक्षात आल्यास ताबडतोब पोलीस विभागास कळवावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. मल्लिानाथ कलशेट्टी व जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी गणेश उत्सवाबाबत सर्व विभागाचा नियोजनाबाबत आढावा घेतला.यावेळी विद्युत विभागाचे श्री. जगताप यांनी सांगितले की गणेशोत्सव व मोहरम काळात कायमस्वरूपी वीज राहील यासाठी व्यवस्था करण्यात आली असून गणेश व मोहरम मंडळाने डायरेक्ट आकडे विजेचा वापर करू नये,

त्यासाठी अल्पदरात वीज कनेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे याचा लाभ घ्यावा.प्रारंभी गणेश मंडळ व मोहरमच्या पदाधिकार्‍यांच्या सूचना प्रशासनाने ऐकून घेतल्या व त्यावर कारवाई करण्याबाबत यावेळी सांगण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक गिरीष पाटील यांनी केले आभार अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी मानले.

LEAVE A REPLY

*