Type to search

maharashtra नंदुरबार

सुलवाडे शिवारात माथेफिरुने पपईचे 90 झाडे कापून फेकली

Share
ब्राम्हणपुरी, म्हसावद । वार्ताहर – शहादा तालुक्यातील सुलवाडे शिवारातील म्हसावद रस्त्यावरील अज्ञात माथेफिरुनीं शेतामधून 150 पपईचे झाडे कापून फेकल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. याबाबत म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुलवाडे येथील मिलिंद भरत पाटील यांचे सुलवाडे शिवारात म्हसावद रस्त्यावर 5 एकर शेत आहे. त्यांनी आपल्या शेतात पपईची लागवड केली आहे. त्यांचे सालदार जगदीश पवार हे सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास बाहेर गेले असता त्यांना शेतातील पपईचे 150 तीन ते चार महिन्याचे पीक व ठिंबक सिंचनच्या नळ्या अज्ञात माथेफिरूनी कापून फेकल्याचे समजले.

त्यांनी तात्काळ आपल्या मालकाला संपर्क करून घटनेची माहिती देताच घटनास्थळी दाखल झाले. म्हसावद पोलीसाना घटनेची माहिती दिली. म्हसावद पोलीस ठाण्याचे कर्मचारींनी घटनास्थळी येऊन पाहणी करून अज्ञात माथेफिरूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. शहादा तालुक्यातील सुलवाडे परिसरात गेल्या वर्षापासून पपई, केळीची उभी पीके कापून फेकल्याचे अज्ञात माथेफिरूकडून वारंवार घटना घडत आहेत. याबाबत पोलीसात गुन्हा दाखल होतो. मात्र कारवाई होत नाही. वारंवार घडणार्‍या घटनांमुळे शेतकर्‍यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!