शाळाबाहय मुले शोधून शिक्षण प्रवाहात आणावेतः जिल्हाधिकारी

0
बामखेडा, ता. शहादा । वार्ताहर- शाळाबाह्य मुले शोधून त्यांना शिक्षण प्रवाहात आणले पाहिजे. गणेशोत्सवाचा खर्च कमी करुन तो पैसा गरजू विद्यार्थ्यांवर खर्च केला पाहिजे. विद्यार्थ्यांनो खेळात भाग घ्या, व्यक्तीमत्व विकास साधा, वाचन करा आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करून यश मिळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.

नंदुरबार येथील कन्यादान मंगल कार्यालयात महात्मा जोतिबा फुले युवा मंचतर्फे माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांच्या हस्ते माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. आनंद माळी, अशोक माळी, मोहन माळी, गिरीश जगताप, भिमराव माळी, मंगलाबाई माळी, ईश्वर मगरे, राजेंद्र माळी, संजय माळी, कविता माळी, प्रतिभा माळी, घनश्याम माळी, किसन माळी, विजय माळी, गुलाब माळी, गोरख माळी, राजेंद्र वाघ, राजेश बागूल, पंडित माळी, रमाशंकर माळी, नानाभाऊ माळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

डॉ. कलशेट्टी यांनी महात्मा फुले युवा मंचचे विशेष कौतुक केले. ते पुढे म्हणाले, महात्मा फुले युवा मंचचे कार्य उल्लेखनीय आहे. स्वच्छता अभियान, वृक्षारोपण आदी उपक्रम संघटनेने यशस्वीरीत्या राबवले. सोहळ्याला जिल्हाभरातून दोनशेच्या वर गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची उपस्थिती मी प्रथमच पाहतो आहे. असे सांगून डॉ. कलशेट्टी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. संघटनेने गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करावी. समाजातील वंचित घटकांना मदत करावी.

स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करावी. समाजातील विद्यार्थी कलेक्टर झाल्यास संघटनेचाही नावलौकिक वाढेल. असे विद्यार्थी पुढे जाऊन संघटनेचे ॠण फेडतील. म्हणून युवा मंचने गरजू विद्यार्थ्यांना मदत करावी, असे आवाहन डॉ कलशेट्टी यांनी केले. पोलीस अधीक्षक संजय पाटील म्हणाले, जो पर्यंत मुली शिकत नाहीत. तोपर्यंत देश पुढे जाऊ शकत नाही. भारताच्या विकासात महिलांचा वाटा मोठा आहे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी लावलेले शिक्षण रुपी रोपटे आता चांगलेच बहरले आहे. अध्यक्ष ईश्वर माळी म्हणाले, महात्मा फुले युवा मंचने नेहमीच समाजोपयोगी कार्य केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यापुढे दरवर्षी आयोजित केला जाईल, असे सांगितले.

यावेळी जगन्नाथ लोखंडे, शशिकला लोखंडे, नरेंद्र जाधव यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पोपट सोनवणे, ईश्वर माळी, गोविंदराव रोकडे, रजनी माळी, गणेश महाजन यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. योगेश माळी, संजय देवरे, सुरेश माळी, निमेश सूर्यवंशी, विनायक माळी, सुरेश चव्हाण, लालचंद माळी, अ‍ॅड. सचिन राणे, लक्ष्मण माळी, अविनाश माळी आदीचा गौरव करण्यात आला प्रास्ताविक ईश्वर माळी यांनी केले. सूत्रसंचालन श्री सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन महात्मा फुले युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर माळी व जिल्हाध्यक्ष नीलेश माळी व सदस्यांनी केले.

LEAVE A REPLY

*