लुपीन फाऊंडेशनतर्फे जिल्हयात सहा घटकांवर काम सुरु

0
नंदुरबार । देशाच्या निती आयोगाच्या शिफारशीने राज्यातील 4 जिल्ह्यांची आकांक्षित जिल्ह्यात निवड करण्यात आली असून त्यात नंदुरबार जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्याचा कृषी, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास व आर्थिक सबलीकरण व्हावे यासाठी लुपीन फाऊंडेशन नंदुरबार जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक योगेश भदाणे व वरिष्ठ प्रकल्प समन्वयक डॉ. हेमंत भदाणे यांनी पालकमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेवून नंदुरबार जिल्ह्याची निवड झाल्याबाबतचे पत्र दिले.

जिल्ह्याची आकांक्षित जिल्हा म्हणून निवड झाल्यामुळे लुपीन फाऊंडेशनने नंदुरबार जिल्ह्यात मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी जिल्ह्यात सहा घटकांवर काम सुरु केले आहे. त्यात कृषी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास आणि आर्थिक सबलीकरण या महत्वाच्या घटकांवर लुपीन फाऊंडेशन जिल्ह्यात 4 ते 5 वर्षे काम करणार आहे. यातून नंदुरबार जिल्ह्यांचा मानव विकास निर्देशांकात निश्चित वाढ होणार आहे.

शासनातर्फे जिल्ह्यात विकासाच्या अनेक योजना राबविण्यात येत असून त्या योजना अधिक जोमाने राबविण्यासाठी लुपीन फाऊंडेशन वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मदत करणार आहे. राबविण्यात येणार्‍या विविध योजनांचा आढावा निधी आयोग, मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या माध्यमातून दर महिन्याला घेण्यात येणार असून त्यातून कामाला गती मिळणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सहाही तालुक्यात टप्प्याटप्प्याने शासन व लुपीन फाऊंडेशनच्या सहकार्याने विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

लुपीन फाऊंडेशनच्या माध्यमातून मागील काळात धुळे जिल्ह्याची निवड करण्यात आली होती. त्यातून अनेक गावांना सिंचनासह इतर कामे करण्यात आली आहे. मानव विकास निर्देशांक वाढविण्याच्या दृष्टीने लुपीनचे काम स्तुत्य आहे.

LEAVE A REPLY

*