श्याम जाधव यांना ‘महाराष्ट्र शिवपूत्र’ पुरस्कार

0
नंदुरबार । खान्देश मराठा समाज परिवर्तन मंडळाचे मुख्य प्रवर्तक शहादा शहरातील उद्योजक श्याम दिनकर जाधव यांना महाराष्ट्र शिवपुत्र या राज्यस्तरीय पुरस्काराने नुकतेच सन्मानीत करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे आ.डॉ.सुधीर तांबे होते. येवला (जि.नाशिक) येथे शिवपुत्र छत्रत्रपती संभाजीराजे बहुद्देशीय संस्थांच्यावतीने राज्यतरीय पुरस्कार विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्तीस देण्यात येतो. यावेळी पदवीधर मतदार संघाचे आ.किशोर दराडे, इतिहासाचार्य डॉ.स्मिता देशमुख, राज्य औद्योगिक विकास महामंडळ सह मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास जाधव,

आरोग्य सेवा सह संचालक डॉ.बी.डी. पवार, अभिनेत्री दिपा कदम, लिज्जत पापड मुख्य कार्यकारी अधिकारी सुरश कोते, जगन्नाथ पाटील आदी उपस्थित होते. श्याम जाधव हे येथील नगरपालिका शिक्षण मंडळाचे 16 वर्षे सभापती होते. मराठा आरक्षण समाज खान्देश विभाग प्रमुख मुख्य प्रवर्तक क्षत्रिय मराठा समाज परिवर्तन मुख्य प्रवर्तक क्षत्रिय मराठा प्रबोधन मंडळ,

अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा, तालुका प्रमुख होते एक रूपयात सामुहिक विवाह प्रथा खान्देशात प्रथम रूजविले सामाजिक शैक्षणिक, त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांचे समाज भूषण समाजरत्न पुरस्कार जळगांव- नंदुरबार, पुणे, मुंबई, नाशिक येथे गौरविण्यात आले. कालच शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे संस्थेच्या वतीने राज्यस्तरी महाराष्ट्र शिवपुत्र हा सन्मान देवून गौरविण्यात आले आहे. त्यांच्या कार्याचा खान्देश समाज मराठा कुणबी समाजाने गौरव केला आहे.

SHARE
Previous articlePic of the day
Next articleSchool Events

LEAVE A REPLY

*