विभागातील सर्व आश्रमशाळांची तपासणी होणार

0
बोरद ता. तळोदा। वार्ताहर – सलसाडी ता.तळोदा येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूची दखल घेत आदिवासी विकास विभागाच्या नाशिक विभागातील सर्व आश्रमशाळांची तपासणी करण्याचे आदेश आदिवासी आयुक्तांनी दिले आहेत.

या शैक्षणिक वषार्र्त दि.31 ऑगस्ट 2018 पर्यंत 14 विद्यार्थी मृत्युमुखी पडले आहेत. याबाबत शैक्षणिक वर्ष संपण्याच्या अगोदर शिल्लक असलेला कालावधी लक्षात घेता नाशिक, कळवण, नंदुरबार, तळोदा, राजुर, धुळे, यावल, या नाशिक विभागातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांना भेटी देऊन विद्यार्थी मृत्यूंची कारणे समजावून घेणे व त्यावर तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे लक्षात घेता आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त यांनी दि. 1 सप्टेंबर 2018 रोजी आदेश काढला आहे.

आता 7 सप्टेंबरपावेतो तपासणी अहवाल आयुक्त कार्यालयात मागविला आहे. नाशिक विभागाच्या आश्रमशाळांमध्यें निवासी विद्यार्थी वास्तव्यास आहेत. अनुचित घटना घडते. प्रसंगी विद्यार्थी पालकांचा ताब्यात असतांना किंवा शाळेत असताना शाळेकडुन विद्यार्थी व्यवस्थेकडे हव्या तेवढ्या प्रमाणात लक्ष न दिल्याने अथवा पुरेशी काळजी न घेतल्याने सर्पदंश श्वानकडून चावा, अथवा इतर कोणताही कारणामुळे विद्यार्थी मृत्युमुखी पडतात असे दिसून येत आहे. त्याकरिता तपासणी करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. ही तपासणी त्या त्या प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण विभाग) व कनिष्ठ व वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, आदिवासी विकास निरीक्षक यांच्यामार्फत पाहणी करण्यात येणार आहे.

दरम्यान तळोदा प्रकल्प अंतर्गत असणार्‍या सलसाडी आश्रमशाळेत विजेचा धक्का लागून विद्यार्थी मयत झाल्याने अधिकार्‍यांवर हल्ला झाला होता. या विषयाची दखल घेत वरिष्ठ पातळीवरून अधिकारी देखील या ठिकाणी घटनास्थळी तपासणी करण्यास भेट देऊन गेलेत. आता तपासणीत निकष कोणते असणार याबाबत अधिकार्‍यांना देखील ठळकपणे मार्गदर्शन मिळाले नसल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*