जिल्ह्यात विश्व आदिवासी दिन उत्साहात साजरा

0
नंदुरबार । जिल्ह्यात विश्व आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शासकीय आश्रमशाळा शहादा
शहादा । ता.प्र.- येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.

शासकीय माध्यमिक आश्रम शाळा शहादा येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. प्रभात फेरीनंतर बिरसा मुंडा, खाज्या नाईक, तंट्या भिल, आदिवासींचे दैवत याहामोगी यांची पूजा करण्यात आली. जागतिक आदिवासी दिवस असल्यामुळे मुलांचे पालकदेखील शाळेत आले होते. यावेळी मुख्याध्यापक राजू बिरारी, ए.एम.पाटील, प्रकाश सोनवणे, श्रीमती टी.एच.महाजन, अरुण पाटील, जी.डी.आखडमल, श्रीमती एम.टी.पाटील, सौ.एच.एल.पटेल, श्रीमती एस.ए.पिंपळे, डी.एन.बुवा, डी.पी.परमार, सौ.ए.सी.पाटील, चेतन उफाडे, विजय पाटील, अधीक्षिका राखी गावित उपस्थीत होते.

खेड कोचरा
खेतिया । वार्ताहर- खेतिया येथे आदिवासी दिनाच्या निमित्ताने खेड कोचरा येथून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भगवा चौक येथे श्याम वासकले, रवी पटेल, सेवकराम नरगावे, उमेश भोसले, रोहित चौहान, चेतन ठाकूर, राजा चौहान, दीनुराज भोसले आदी युवकांनी स्वागत करून आतिषबाजी केली. सदर मिरवणूक गांधी चौक, रवींद्रनाथ टागोर चौक, अशोक रोड, वासकले परिवार व समाजाचे वरिष्ठांनी मिरवणूकीचे स्वागत करून श्रीफळ व टिळक लावून केला. यापूर्वी आदिवासी युवातर्फे रवींद्रनाथ टागोर चौकात क्रांतिकारी बिरसा मुंडा यांची पूजा अर्चना करून प्राथमिक आरोग्य केंद्रात फळ वाटप करण्यात आले. यावेळी केंद्राचे डॉ.ढोले, डॉ.अंकलेश अशिले, मनोज डावर, गणेश सोलंकी उपस्थित होते. आदिवासी समाज बांधव युवा पारंपरिक पद्धतीने वेशभूषा धारण करून ढोल -मांदळ च्या तालावर अनुशास्त्मक पद्धतीने नाचत गाजत कोचरा येथे एकत्रित झाले. कार्यक्रमात बाबुलाल पटले, खेडचे सरपंच अविनाश मुसळदे, श्याम वासकले, रवी पटेल, मांगीलाल, अमरसिंग सोलंकी, सुहास वलोके, सुनिल सुळे, अरविंद डुडवे, विरेंद्र रावतले, पंकज चौहान, सुनील वासकले, शौर्य वासकले आदी समाज बांधव उपस्थित होते.

डी.आर.हायस्कुल
आदिवासी सेवा संस्था पुरस्कार प्राप्त, अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त भालचंद्र पुरस्कारप्राप्त श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल नंदुरबारमध्ये विश्व आदिवासी दिवस व क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला आदिवासींचे अलंकार व वाद्य साहित्य याबाबत माहिती देऊन हा दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.

अध्यक्षस्थानी संस्थेचे विद्यमान चेअरमन गिरीश खुंटे, प्रमुख पाहुणे म्हणून राजाभाई दिवाण होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक प्रकाश पिंपळे, उपमुख्याध्यापक अतुल जोशी, पर्यवेक्षक पंकज पाठक, श्रीराम मोडक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी आदिवासी संस्कृती व आदिवासी वीर यांबाबत माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुहास वळवी यांनी केले. प्रास्ताविक राजश्री गायकवाड, परीचय सत्कार हेमंत खैरनार व आभारप्रदर्शन सुनिता बागुल यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उत्सव समिती व वंदना पाडवी, किसन पावरा, दिनेश वाडेकर, जयंत लोहार, गजानन अहिरे यांनी परीश्रम घेतले.

बीटीआर हायस्कुल मोड
मोड ता.तळोदा। वार्ताहर – तळोदा तालुक्यातील मोड येथील कॉ.बीटीआर हायस्कुल येथे विश्व आदिवासी दिवसाच्या निमित्ताने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.

अध्यक्षस्थानी अंबरसिंग महाराज, ज्ञानविज्ञान संस्थेचे सचिव व मोड गावचे सरपंच जयसिंग माळी होते. प्रमुख पाहुणे म्हणून अंबरसिंग संस्थेचे अध्यक्ष मंगलसिंग चव्हाण, ग्रा.पं.सदस्य सुभाष ठाकरे, मुख्याध्यापक आय.जी.पिंजारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना यावेळी प्रेरणादायी इतिहास आणि संस्कृती याबद्दल माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष मंगलसिंग चव्हाण, सचिव जयसिंग माळी, शिक्षक मुन्ना वसावे, सुभाष अहिरे, फुंदीलाल माळी, चंद्रकला वसावे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी संस्कृतीचे गीते सादर केली. कार्यक्रमास शिक्षक आर.एल.मगरे, एस.एन.लाडे, एस.एस.पाटील, श्रीमती जी.टी.मराठे, पी.टी.मराठे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सी.डी.वळवी, डी.एस.मोरे, बी.आर.कोळपे, ए.एल.ठाकरे, एम.बी.जाधव आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन फुंदीलाल माळी यांनी केले. आभार मुख्याध्यापक आय.जी.पिंजारी यांनी मानले.

फत्तेपूर जि.प.शाळेत आदिवासी दिन साजरा
म्हसावद । वार्ताहर – जि.प. शाळा फत्तेपूर येथे विश्व आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात गावात प्रभातफेरी काढून करण्यात आली. प्रभातफेरीमध्ये विद्यार्थी पारंपरिक पोशाख परिधान करून सहभागी झाले होते. या चिमुकल्यांना या वेशात पाहून भव्य अशा आदिवासी संस्कृतीचे दर्शन झाले.

ज.पो. वळवी महाविद्यालय
धडगांव। प्रतिनिधी- येथील महाराज ज.पो.वळवी महाविद्यालयाच्या सांस्कृतीक मंडळातर्फे विश्व आदिवासी दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शहादा महाविद्यालयाचे प्रा. खुमानसिंग वळवी यांनी आदिवासी शिक्षण व संस्कृती दशा आणि दिशा या विषयावर विवेचन केले तर सुरुवातीला आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा व वीर एकलव्य तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष महाराज ज पो वळवी यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी ही मनोगत व्यक्त केले.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील हे होते. प्रा. एन. पी. विभांडीक, प्रा.डॉ के. ए. पावरा, डॉ. बी.जी. पवार, प्रा. आर.जी पवार, प्रा. एस. एस. पाटील आदीची प्रमुख उपस्थिती होती. प्रा.डॉ. व्ही.जी. गोणेकर, प्रा. अनिल शिंदे, डॉ. एस. ई. शिंदे , डॉ. हरीभाऊ पवार, प्रा. कल्पना साळवे यांनी संयोजन केले. सुत्रसंचालन डॉ. मनोहर पाटील यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.ए.एस. राठोड यांनी केले.

एकलव्य विद्यालयात
नंदुरबार । येथील एकलव्य विद्यालयात विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात आला. उपमुख्याध्यापक एच.एच. खैरनार उपस्थित होते.

कार्यक्रमाला आदिवासी समाजाची कुलदैवत याहामोगी माता, आदिवासी क्रांतीकारक वीर बिरसा मुंडा व विद्येची देवता माता शारदा यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरूवात झाली. प्रमुख वक्ते म्हणून विद्यालयाचे उपशिक्षक राजेश वळवी उपस्थित होते. उपमुख्याध्यापक एच.एच.खैरनार आदी उपस्थित होते. अहिल्या कन्या छात्रालय, महात्मा गांधी छात्रालय तसेच बाहेरून ये-जा करणार्‍या आदिवासी मुला-मुलींनी विश्व आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा देणारे आकर्षक भेटकार्ड तयार केले. या सर्व बाबींचे प्रदर्शन मांडण्यात आले. या प्रदर्शनीचे अध्यक्ष उपमुख्याध्यापक श्री.खैरनार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी आर.बी.त्रिवेदी कार्यक्रमाला विद्यालयाचे पर्यवेक्षक ए.एन.पाटील, ज्येष्ठ शिक्षक, एच.जी.कागझी, सौ.एम.व्ही.मोरे, श्रीमती एन.एम.गांगुर्डे, सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख संतोष पाटील, जी.पी.धुमाळ, डी.एच. माळी उपस्थित होते. उपशिक्षक आर.आर. गावीत यांनी केले. सुत्रसंचलन टी.एन. पाडवी यांनी केले. आभार जे.एस. गावीत यांनी मानले.

LEAVE A REPLY

*