राष्ट्रध्वजाचा मान राखावा!

0

नंदुरबार । स्वातंत्र्यदिनानिमित्त प्लॅस्टिकच्या ध्वजावी विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीतर्फे करण्यात आली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता मात्र याचे विस्मरण होऊन केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी मोठ्या अभिमानाने राष्ट्रध्वज मिरवले जातात.

हेच कागदी/प्लास्टिकचे राष्ट्रध्वज त्या दिवसापासूनच रस्त्यावर आणि गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. प्लास्टिकचे ध्वज तर तात्काळ नष्टही होत नाहीत. त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजाची विटंबना पहावी लागते. म्हणुन स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रध्वजाचा अवमान रोखावा आणि शासनाने बंदि घातलेले प्लास्टिकचे ध्वज विक्री करणार्‍यांवर गुन्हे दाखल करावे.

या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीने निवासी उपजिल्ह्याधिकारी अनिल पवार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना दिले आहे. त्यानुसार प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विक्री करतांना आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिले आहेत. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे डॉ.नरेंद्र पाटील, सतीष बागुल, जितेंद्र मराठे, दिग्विजय ठाकरे, मयूर चौधरी, गणेश चौधरी, आकाश गावित हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*