नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

0
नंदुरबार । नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश आज विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोरजे यांनी काढले आहेत. यात नंदुरबार जिल्ह्यातील 13 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

तर 2 पोलीस उपनिरीक्षकांच्या सेवानिवृत्तीचा कालावधी जवळ आल्याने त्यांच्या बदलीला मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच 1 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 3 पोलीस निरीक्षक व 4 पोलीस उपनिरीक्षकांनी बदलीसाठी अर्ज दिले होते. परंतु त्यांची बदली नामंजूर करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोपट गुळींग, यादव सखाराम भदाणे, उमृत नामदेव पाटील, रामकृष्ण गंगाराम खैरनार, रमेश वावरे यांची नंदुरबारहून जळगांव, प्रविण प्रतापराव भोसले, संतोष तुकाराम लोले यांची नंदुरबारहून अहमदनगर, ताथू पुना निकुंभ, आनंदा नामदेव पाटील, श्रीमती गितांजली व्ही.सानप यांची नंदुरबारहून धुळे, युवराज यादव सैंदाणे, श्रीमती संगिता लिलानंद कदम यांची नंदुरबारहून नाशिक ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे.

तर सेवानिवृत्ती समीप असल्याने धनराज शेनपडू महिरे व दिलीप नारायण चौधरी यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महेश कैलास क्षिरसागर, देविदास राघो नेरकर, अन्सार राजमहंमद इनामदार, संदिप वैजनाथ दहिफळे यांची अहमदनगरहून नंदुरबार, रमेश नामदेव पवार, नसिरखॉ कलमशेरखॉ पठाण, निलेश रमेश मोरे व अतुल रमेश तांबे यांची धुळेहून नंदुरबार, विजय आनंद नरवाडे, ज्ञानेश्वर शिवराम पाकळे, मिलींद हरी बागुल, शिवाजी जानराव नागवे, निलेश दिवानसिंग वतपाळ यांनी जळगांवहून नंदुरबार बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलीस निरीक्षक गिरीश भास्करराव पाटील, दिपक किसनराव बुधवंत, संजय रघुनाथ मथुरे, पोलीस उपनिरीक्षक दिपक हसन बागुल, विक्रांत राजेंद्र कचरे, बापू धुडकू शिंदे, श्रीमती प्रियदर्शनी पांडुरंग थोरात तर सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शिवाजी कामाले, संतोष नारायण भंडारे यांनी बदलीसाठी अपील केले होते. परंतू त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

*