Type to search

नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा – सौ.रघुवंशी

नंदुरबार

नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा – सौ.रघुवंशी

Share

नंदुरबार । नंदुरबार शहरास 30 टक्के पाणी पुरवठा करणार्‍या आंबेबारा धरणात पाण्याचा साठा शिल्लक राहीला नसल्याने तसेच आष्टे येथिल पाणी पुरवठा करणाच्या विहीरी पुर्णत: आटल्याने नंदुरबार शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने व जपुन वापर करावा असे आवाहन नगराध्यक्ष सौ.रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केला आहे.

आष्टे येथिल पाणी पुरवठा बंद झाल्याने झराळी येथुनच संपुर्ण नंदुरबार शहरास पाणी पुरवठा होत आहे. झराळी येथे विजेची सुध्दा काही प्रमाणात अडचणी येतात. व त्यामुळे नगर परीषद पाणी पुरवठा वेळेवर करु शकत नाही. या पुढेही काही वेळेला पाणी पुरवठाच्या वेळा पत्रकात बदल होईल. प्रसंगी पाणी पुरवठा उशिरा होईल या बाबत जनतेने सहकार्य करावे. तरी नागरीकांनी पाण्याचा वापर काट कसरीने व जपुन करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा, नळांना तोटया बसवुन घ्यावेत. पाईप लाईन गळती झाल्यास त्वरीत नगर परीषदेस कळवावे, अंगणात पाणी शिंपडु नये,आपले पाणी भरुन झाल्यास नळ बंद करावा, असे आवाहन नगराध्यक्ष सौ रत्ना चंद्रकांत रघुवंशी.उपनगराध्यक्ष खान, सभापती पाणी पुरवठा कैलास पाटील, मख्याधिकारी गणेश गिरी, व विशाल कामडी, अभियंता पाणी पुरवठा विभाग नंदुरबार नगर परीषद यांनी केले असुन नागरीकांनी नगर परीषदेस सहकार्य करावे. असे आवाहन त्यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!