Type to search

maharashtra नंदुरबार

मोड परिसरात भुजल पातळीत घट, ऊस-पपई पिकांवर परिणाम

Share
मोड । वार्ताहर- परिसरातील भुजल पातळीत घट झाल्याने ऊस, केळी, कपाशी, पपई पिकांवर परिणाम झाला आहे.

मोड परिसरातील निझरा नदीच्या खोर्‍यातही पर्जन्यमान दरवर्षी घटू लागल्याने भुजल पातळी झपाटयाने खोल गेली आहे. परिसरातील शेतकरी ऊस केळी बागायती कपाशी मिरची पपई सारखी बारमाही पिक मोठया प्रमाण्यात घेऊन सुखी समाधानी होता. बारमाही पिकामुळे मजुर वर्गालाही वर्षभर रोजगार उपलब्ध होता. त्यामुळे परिसरात दुष्काळ चार हात लांबच होता. परंतु गेल्या पाच-सहा वर्षापासुन वार्षिक पर्जन्यमानात सातत्याने घट होत असल्याने भुजलात मोठयाप्रमाणात घट झालेली आहे. भुगर्भातील जलसाठयाने यावर्षी 200 फुटाच्या खाली भुजल पातळी खोल गेल्याने शेतातील पीक वाचविण्यासाठी नविन केलेल्या टयुबवेलही फेल गेल्या आहेत.

काही शेतकर्‍याची उभी केळी, ऊसाचा खोडवासारखी दोन पैसे मिळवून देणारी पीकेही यावर्षाचा दुष्काळाचा दाहकतेत होरपळून गेली आहेत. यावर्षी नविन ऊस लागवडीवरही परिणाम झाल्याने ऊसटंचाई जाणवत आहे. शेतकरी वर्ग शेतातील ऊभे पीक कसे वाचेल, यासाठी शेजारील शेतकर्‍याच्या टुबवेलचे पाणीघेऊनही पीक वाचविण्याची धडपड सुरू आहे. परिसरातील भुजल पातळी वाढवाण्यासाठी प्रशासनानेही जलयुक्त शिवारासारखे उपक्रम परिसरात नियोजन करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. निझरा नदीचे निम्मे खोरे कोरडे झाले आहे. शासनाने या परिसराचे जलस्त्रोत मजबूत करण्यासाठी तातडीने नियोजन करण्याची मागणी केलेली आहे. केळीसारख्या नगदी पीकावर यावर्षी काही शेतकर्‍यांना रोटाव्हेटर फिरवावा लागला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!