Type to search

22 उपसा सिंचन योजनांचे काम पूर्णत्वाकडे न्यावे!

maharashtra नंदुरबार

22 उपसा सिंचन योजनांचे काम पूर्णत्वाकडे न्यावे!

Share
शहादा । ता.प्र. – जिल्हयातील 22 उपसा जलसिंचन योजनांचे काम अत्यंत संथगतीने सुरु असल्याने या कामांना गती मिळावी व वेळीच कामे पूर्ण व्हावे म्हणून श्री सातपुडा साखर कारखान्याच्या आवारात कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांना परीसरातील उपसासिंचन योजनांचे पदाधिकारी व शेतकर्‍यांनी निवेदन देऊन योजनांचा कामाबाबत चर्चा केली.

यावेळी शेतकर्‍यांनी असे सांगीतले की, 26 मे पर्यंत योजनांच्या कामास गती नाही मिळाली तर 27 मे पासुन आमरण उपोषण आंदोलन करणार आहोत. श्री.दीपक पाटील यांनी आलेल्या योजनांचे पदाधिकारी व शेतकर्‍यांचे योजनांचा कामाविषयी म्हणने ऐकून घेऊन त्यांना सांगितले की योजनांच्या कामांचा आढावा घेऊन मी लवकरच मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, पालक मंत्री यांना आपल्या निवेदनासह भेटतो. आपली कैफियत त्यांच्यापर्यंत पोहचवतो. वास्तविक कामांची जुळवणी करतांना व टेंडर देतांना खूप वेळ निघून गेला व उशीराने कामे सुरु झाली तरीदेखील मे अखेर कामे पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु तशी स्थिती दिसत नाही. याबाबत नेमकी कोणाची व काय अडचण आहे हे देखील कळत नाही, फक्त लालफितीत कारभार अडकला असल्याचे हे निवेदनकर्त्यांनी चर्चेत सांगितले.

दीपक पाटील म्हणाले की मध्यंतरी दोन वेळा निधी संपला होता तेव्हा मी स्वत: ना.गिरीष महाजन यांना पत्र देऊन त्याबाबत अवगत केले असता निधीची रक्कम वर्ग झाली, आताही निधीची अडचण असल्यास त्याबाबत मंत्री महोदयांशी चर्चा करुन निधी उपलब्ध करुन घेता येईल. चर्चेत शिरुड, कळंबू, कहाटूळ, बामखेडा त.त, लहान शहादा, कोपर्ली, काकर्दे, विरदेल, समशेरपूर, विरदेल, शिंदखेडा, नेवाडे व वरसुस येथील योजनांचा शेतकर्‍यांनी असे सांगीतले की आमच्या योजनेंच्या विद्युत वाहिणीच्या कामास अद्यापपावेतो सुरुवात नाही. केव्हा विद्युत पुरवठा जोडला जाईल याची शास्वती नाही. तसेच निमगुळ, दाऊळ मंदाणे, धमाणे, पुसनद, सारंगखेडा व बिलाडी येथील योजनांचा शेतकर्‍यांनी व्यथा मांडली की योजनेच्या लाभक्षेत्रातील पाणी वाटपाचे संपूर्ण व्हॉल बदलुन शेवटचा चेंबरपर्यंत पाणी येणे आवश्यक असतांना, योजनेचा मुख्य पाणी वाटप चेंबरपर्यंतच पाणी टाकण्याचे काम करण्याचे सिंचन विभागाच्या अधिकार्‍यांनी सुचना दिल्या आहेत असे संबधीत ठेकेदार सांगतात. त्यामुळे पुढील कामे कोणी करावीत त्याबाबत संबधीत आधिकारीही उडावाउडवीची उत्तरे देतात, त्यामुळे योजनेचे दुरुस्तीचे संपूर्ण काम कधी पूर्ण होऊन लाभधारकांना केव्हा पाणी मिळेल याची आम्हा शेतकर्‍यांना शास्वती वाटत नाही. वास्तविक पाहता कामाचा निविदेच्या अटी व शर्तीनुसार योजनेच्या शेवटच्या चेंबरपर्यंत व्हॉल्व दुरुस्ती, चेंबर दुरुस्ती,पाईपलाईनींचे लिकेजेस काढणे ही सर्व कामे अंतर्भुत असतांना सिंचन विभागाचे अधिकारी शेतकर्‍यांची दिशाभुल करुन ठेकेदारांची बाजु घेत आहेत असा आरोप संबधीत योजनेचा शेतकर्‍यांनी केला आहे.

तसेच बाम्हणे, धमाणे येथील शेतकर्‍यांनी असे सांगितले की मागे तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता हे आमच्या योजनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले असतांना त्यांच्यासोबत शेतकर्‍यांनी योजनेच्या कामाबाबत चर्चा केली असता मुख्य अभियंत्यांंनी असे सांगीतले की योजनेच्या मुख्य पाण्याचा टाकीपर्यंतच पाणी काढावे व त्या पुढील कामे शेतकर्‍यांनी करावी असे शासनाचेच आदेश आहेत. त्यामुळे तेवढे काम झाले की आमचे काम संपनार आहे. म्हणुन योजनांचे लाभधारक शेतकरी फारच हवालदिल झाला आहे. तसेच धमाणे, दाऊळ मंदाणे, निमगुळ, सारंगखेडा, पुसनद व बिलाडी येथील योजनांचे पंप 15 मिनीट ते 30 मिनीट पर्यंत चालुन केवळ पंपच चालविण्याची चाचणी घेऊन त्यानंतर योजनेचे काही काम झालेले नसल्याबाबतची तक्रार त्यांनी केली.

योजनांचा दुरुस्ती कामाबाबत अनेक शेतकर्‍यांना मनमोकळे पणाने आपले विचार कथन करुन आपणच योजनांचा संपूर्ण व आवश्यक कामांचा बाबतीत शासनाशी चर्चा करुन मार्ग काढून पुन्हा एकदा आम्हा शेतकर्‍यांना सहकार्य करावे असे सांगीतले असता चेअरमन दीपक पाटील यांनी सांगितले मी लवकर मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री व पालक मंत्र्यांना आपले निवेदन देऊन भेटणार आहे. पुढील कार्यवाही लवकर व्हावी म्हणून त्यांना विनंती करणार. या आश्वासनानंतर शेतकरी मागे झाले असून 22 योजनांचे आलेले पदाधिकारी व शेतकरी घरी परत गेले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!