नवापूर-उच्छल रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

0
नवापूर । दिनवापूर-उच्छल रस्त्याची अत्यंत दूरवस्था झाली असून या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन समस्या सोडवावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

नवापूर ते उच्छल हे दोन राज्यात असलेले शहर असले तरी हे दोन्ही एकमेकांचे विभिन्न अंग आहेत. नवापूर ते उच्छल रोज शेकडो नागरिक अपडाऊन करतात. यात काही राजकिय नेते, शासकिय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, शालेय विद्यार्थी, व्यापारी आणि आपल्या दैनंदिन कामांसाठी जवळजवळ 80 टक्के नागरिकांना नवापूर ते उच्छल ये-जा करावी लागते. काहिंचे निवास उच्छल असून दुकान नवापूरला तर नारायणपूर व परिसरातील नागरिकांना नवापूर येथे काहिनाकाही कामांसाठी यावे लागते.

अशा नागरिकांना उच्छल जाण्यासाठी दोन मार्ग असून एक महामार्गावरून रेल्वे पुलाखालून रस्ता आहे तर दुसरीकडे रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या रेल्वे गेटवरून एक रस्ता जातो. सध्या रेल्वे प्रशासनाने हा रस्ता बंद केल्याने चार चाकी वाहन येथून जात नाही. त्यामुळे आता रेल्वे पुलाखालून खाकरफळी मार्गाने वाहनचालकांना ये-जा करावी लागते. सद्यस्थितीत महामार्गापासून खाकरफळी मार्गाने जाणार्‍या रस्त्यावर अतिशय खड्डे झाले असून विशेष म्हणजे पुलाखालून जाणार्‍या रस्त्यावर या खड्डयात पाणी साचून जाते.

त्यामुळे वाहन चालवणार्‍या व्यक्तीला कसरत करावी लागते. सदर रस्ता नवापूर पालिकेच्या हद्दीत येत असून तो रस्ता त्वरित दुरुस्ती करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जाते. आधीच हा रस्ता पुलाखालून जातो व तो खड्डेमय असल्याने त्यात पाणी भरून गेल्यावर तो रस्ता वाहन चालवणार्‍या दिसत नाही. म्हणून पालिकेने वेळीच जागे होऊन सदर रस्त्याची दुरूस्ती करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

*