Type to search

maharashtra नंदुरबार

विनयभंग करणार्‍यास दोन वर्ष कारावास

Share
नंदुरबार । तळोदा तालुक्यातील रोझवा येथे घराची कौले काढुन घरात अनधिकृतपणे प्रवेश करुन महिलेचा विनयभंग करणार्‍या आरोपीस तळोदा न्यायालयाने 2 वर्ष सश्रम कारावास व 5 हजार दंडाची शिक्षा सुनावली आहेे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिलेचा पती मयत झाल्याने त्या लहान मुली सोबत रोझवा पु.व.-4 ता.तळोदा जि.नंदुरबार या ठिकाणी त्यांच्या भावाच्या घराशेजारीच किराणा दुकान चालवुन स्वत:चे कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होत्या.त्यांची मोठी मुलगी बाहेर गावी शिकत होती. फिर्यादी महिला यांना रात्री घरात भिती वाटत असल्याने त्या शेजारील नात्यातील असलेल्या मुलीस रात्री जवळ झोपणेसाठी घरी बोलावुन घेत असत. फिर्यादी महिला व शेजारील मुलगी या रात्री नेहमी प्रमाणे झोपल्या होत्या. रात्री 12 वाजेच्या सुमारास घराचे कौले घराची कौले काढुन घरात अनधिकृतपणे प्रवेश करुन आरोपी तुमडया ऊर्फ आखाडया मोना पावरा याने पिडीत फिर्यादी महिलेचा उजवा हात पकडुन वाईट कृत्य करण्याच्या इराद्याने तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केेले.

पिडीत महिलेने आरोळी मारुन शेजारीच राहणारा तिच्या भावास बोलावून घेतले होते. नंतर आरोपी तुमडया ऊर्फ आखाडया मोना पावरा हा फिर्यादी महिलेच्या घरातुन पळुन जात असतांना तिच्या भावाने देखील त्यास पळतांना पाहीले.याप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाची सुनावणी न्या. एम. जी. मोरे यांचे न्यायालयात होवुन आरोपीविरुध्द गुन्हा शाबीत झाल्याने आरोपी तुमडया ऊर्फ आखाडया मोना पावरा यास 2 वर्ष सश्रम कारावास व 5 हजार हजार दंडाची शिक्षा सुनावली आहेे.दोषारोपपत्र असई मक्कन शिंदे यांनी सादर केले होते. सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सरकारी वकील अ‍ॅड. धिरजसिंह चव्हाण यांनी पाहिले. तसेच सदर खटल्यात पैरवी अधिकारी म्हणुन असई अनंत गावीत यांनी कामकाज केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!