नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण; सी-व्हीजील अ‍ॅपवर

100 मिनिटात होणार कारवाई, अप्पर जिल्हाधिकार्‍यांची माहिती

0
नंदुरबार । लोकसभा निवडणुकीसाठी सि-व्हिजिल अ‍ॅप विकसीत करण्यात आले असून याद्वारे सामान्य नागरीक निवडणुकीबाबत तक्रार करु शकतील व तक्रारदाराच्या तक्रारीचे 100 मिनिटात निराकरण करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी दिली. दरम्यान, आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी नंदुरबार लोकसभा मतदार संघात निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने सर्वातोपरी तयारी केली असून निवडणूक कामासाठी नेमण्यात आलेल्या भरारी पथक व वेगवेगळया पथकांचा आढावा अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी आज घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसामुंडा सभागृहात आज अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा सार्वत्रिक निवडणुक प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्वच टिम व अधिकार्‍यांचा आढावा घेतला. आतापर्यंत झालेल्या कामाची माहिती जाणून घेत त्यात राहिलेल्या त्रुटीची तातडीने पुर्तता करण्याची कार्यवाही करण्याच्या सुचना श्री. जगदाळे यांनी संबंधित पथकांना दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) धनजंय निकम, उपजिल्हा निवडणुक अधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी (ससप्र) जयसिंग वळवी उपस्थित होते.

श्री.जगदाळे यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या विविध टिमचा आढावा घेतला त्यात उपलब्ध मनुष्यबळ, ई.व्हि.एम., व्ही.व्ही पॅट, टास्कफोर्स, ट्रेनिंग मॅनेजमेंट, उपलब्ध साधन सामुग्री, खर्च, कायदा व सुव्यवस्था, बॅलेट पेपर, एस.एम.एस, पोस्टल बॅलेट, स्ट्राँगरुम, सायबर सेक्युरीटी, दिव्यांग मतदारांची व्यवस्था, वाहन व्यवस्था मतदान केद्रावर पिण्याचे पाणी, इलेक्ट्रीसिटी, शैाचालय, मोबाईल रेंजसाठी, रनर, नियुक्त झोनल ऑफिर्स, ट्रान्सपोर्ट, प्लॅन, कर्मचारी डाटा माहिती, मतदान केंद्रे, प्लॉईंग स्कॉड, सि-व्हिजील, सुगम, सुविधा समाधान, गोडावुन व्यवस्था स्वीप कार्यक्रम, मिडीया सेंटर, आदी निवडणूक कामात सहभागी झालेल्यांचा सविस्तर आढावा घेतला.

श्री.जगदाळे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या प्रत्येक पथकाने आपले काम जबाबदारीने करावयाची असून सर्व कार्यरत टिमांनी एकमेकांशी संवाद साधून आपले काम व्यवस्थित करावे. जिल्हाधिकारींच्या अधिपत्याखाली आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच मतदार संघात भरारी पथके व अन्य पथके नेमण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी सि-व्हिजिल अ‍ॅप वापरण्यात येणार असून याद्वारे सामान्य नागरीक तक्रार करु शकतील व तक्रारदारास 100 मिनिटात त्यांचे तक्रारीचे निराकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

*