21 लाखाच्या कापूस खरेदीप्रकरणी तिघांना अटक

0
नंदुरबार । दि.27 । प्रतिनिधी-नंदुरबार तालुक्यातील कोळदा येथे शेतकर्‍यांकडून कापूस खरेदी करून त्यांना 21 लाखाचा गंडा घातल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, नंदुरबार तालुक्यातील कोळदा येथील परिसरातील भरत शंकर पाटील व परिसरातील शेतकर्‍यांचा कापूस निलेश मणिलाल पाटील, मणिलाल भाईदास पाटील रा.करणखेडा (ता.नंदुरबार), लाला राजाराम पाटील रा.शिंदे (ता.नंदुरबार) या तिघांना विकला.

या व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांना काही पैसे रोख दिले व बाकीचे नंतर देतो असे विश्वासात घेवून कापूस घेवून गेले. ही घटना दि.20 मे रोजी घडली.

त्यानंतर आजतागायत सर्व शेतकर्‍यांचे मिळून 20 लाख 95 हजार 721 रूपयाचे पेमेंट त्यांनी केले नाही. म्हणून भरत शंकर पाटील रा.कोळदा यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

त्यानुसार त्यांना काल रात्री 10 वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली.

 

LEAVE A REPLY

*