Type to search

Breaking News नंदुरबार

स्वच्छ, सुंदर व सुदृढ राष्ट्रनिर्मितीसाठी स्वच्छता महत्त्वाची

Share

नंदुरबार  – 

स्वच्छ,सुंदर व सदृढ राष्ट्रनिर्मितीसाठी निरोगी आयुष्य महत्त्वाचे आहे. आरोग्य आणि स्वच्छता यांचा जवळचा संबंध असून निरोगी आयुष्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयी अंगीकाराव्यात. शौचालयाचा नियमित वापर करून  आपले गाव व शहर स्वच्छ ठेवावे असे आवाहन  जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भारुड यांनी केले.

नंदुरबार जिल्हा परिषद, सी.वाय.डी.ए. वॉटर एड आणि प्लान या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेच्या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ.भारूड बोलत होते.मॅरेथॉन   स्पर्धेस नवापूर चौफुली येथून  सुरुवात करण्यात आली. स्पर्धेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भारुड व जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी हिरवी झेंडी दाखवून करुन दिला.

स्पर्धेसाठी नवापूर चौफुली जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद मार्गे नवापुर रस्त्यावरील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया मार्गे नवापूर चौफुली पर्यंत असा एकूण 5 कि.मी. चा मार्ग घेण्यात आला होता. दि.19 नोव्हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिवस म्हणून साजरा केला जातो.

मॅरेथॉन स्पर्धेत आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी सुमन पंत, तळोद्याचे प्रकल्प अधिकारी पांडा साहेब, प्रकल्प संचालक अनिल सोनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) भूपेंद्र बेडसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) शेखर रौदळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा.व स्व.) डॉ. वर्षा फडोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मग्रारोहयो) अनिकेत पाटील, गट विकास अधिकारी अशोक पटाईत, सीवायडीए संस्थेचे सचिव मॅथू मित्तन, प्रविण जाधव, लायन्स क्लबचे समीर शहा, वाटर एडचे जितेंद्र कटरे, विशाल कटरे ज्ञानप्रकाश फांऊडेशन यांचेसह आदिवासी विकास आश्रम शाळेचे,माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.

प्रारंभी धनराट येथील आदिवासी विकास आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य करुन स्वच्छतेचे संदेश, शौचालयाचे वापर व महत्व पटवून दिले. यानंतर स्पर्धेस सुरुवात झाली. स्पर्धेत विद्यार्थ्यांमधुन भगतसिंग रामसिंग वळवी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर दारासिंग जामसिंग पावरा यांनी द्वितीय तर केंसरसिंग बोट्या पावरा याने तृतीय क्रमांक पटकावला.

मुलीमध्ये जयमाला रिता चौधरी या विद्यार्थीनीने प्रथम क्रमाक मिळविला तर अधिकारी  कर्मचार्‍यांमध्ये प्रकल्प संचालक अनिल सोनवणे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक मंगेश निकम  यांनी केले तर डॉ. वर्षा फडोळ यांनी मानले.स्पर्धा यशस्वीतेसाठी सी.वाय.डी.ए. सामाजिक संस्थेचे कर्मचारी व स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत कक्षातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!