विकासोचे जिल्ह्यात एक लाख सभासद

0
नंदुरबार । दि.19 । प्रतिनिधी-राज्यातील सर्व शेतकर्‍यांना त्या त्या गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सभासद करून घेण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन विभागाने सर्व जिल्हा उपनिबंधक यांना दिले होते.
त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक विविध कार्यकारी संस्था 138 असून आदिवासी विविध कार्यकारी संस्था 97 अशा एकूण जिल्ह्यात 235 विविध कार्यकारी सेवा संस्था कार्यरत असून त्यानुसार जिल्हयात 14 हजार 981 शेतकर्‍यांना नव्याने सभासद करून घेण्यात आले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे एस.वाय. पुरी यांनी दिली.
नंदुरबार जिल्ह्यात एकूण 1 लाख 48 हजार शेतकरी खातेदार आहेत. त्यापैकी 21 हजार 332 शेतकरी हे प्राथमिक वि.का. व आदिवासी वि.का.चे सभासद होण्यासाठी पात्र आहेत.

त्यापैकी 84 हजार 668 शेतकरी हे पुर्वीपासून विविध कार्यकारी सोसायटीचे सभासद आहेत. त्यामुळे उर्वरीत शेतकर्‍यांना सभासद करून घेण्याचे आदेश सर्व सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक यांनी गटसचिवांच्या सहाय्याने त्या त्या गावात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

जे शेतकरी सभासद होण्याचे बाकी राहिले आहेत. अशा शेतकर्‍यांनी आपापल्या गावातील सोसायटीकडे रितसर अर्ज करून त्यासाठी असलेली नाममात्र फी भरून प्राथमिक विविध कार्यकारी सोसायटीचे सभासद व्हावे व पूर्ण भाग खरेदी करण्यासाठी संबंधीत विविध कार्यकारी सोसायट्यांनी अर्थसहाय्याचे प्रस्ताव सहाय्यक निबंधक यांच्यामार्फत संस्थेच्या जिल्हा उपनिबंधकांकडे मंजूरीसाठी सादर करण्याचे आवाहन एस.वाय. पुरी यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*