नवापुरातील आदर्शनगरात गटारी नसल्याने सांडपाणी रस्त्यावर

0
नवापूर । येथील आदर्शनगरात जलवाहिनी टाकली नसल्यामुळे या भागातील नागरिकांना कुपनलिकांवर अवलंबून राहावे लागते. मात्र, कुपनलिकांचेही पाणी आटल्याने नागरिकांना प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या भागात जलवाहिनी टाकण्यात यावी तसेच गटारी व रस्त्यांचे काम करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आदर्श नगरात अनेक कुटुंबाचे वास्तव्य आहे. या भागात जलवाहिनी नसल्याने प्रत्येकाने पाण्यासाठी कुपनलिका केल्या आहेत. मात्र, या भागाची भूजलपातळी कमी झाल्याने काही कुपनलिका आटल्या आहेत. त्यामुळे नागरिकांवर जारचे पाणी पिण्याची वेळ आली आहे.

काही जण शहरातील वसाहतीत जाऊन पाणी आणतात. या भागात असलेली पिण्याच्या पाण्याची टाकी फुटली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे अदर्श नगरत नगरपालिकेने जलवाहिनी टाकावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आदर्श नगरातील गटारी उघड्या असून, त्या ठिकठिकाणी तुंबल्या आहेत. नगरपालिकेचे कर्मचारी गटारीची सफाई करण्यासाठी येत नाही. त्यामुळे परिसरात मच्छरांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने या भागातील गटारी बंदिस्त कराव्यात. रस्त्यावर केवळ खडी टाकण्यात आली असून, अद्यापही डांबरीकरण करण्यात आलेले नाही. ते करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी अ‍ॅड.भानुदास कुलकर्णी, शादाब शेख, अ‍ॅड.ॠतुल कुलकर्णी, छोटूलाल चव्हाण, रविंद्र पवार, भास्कर मोरे, भटू बंजारा, गुलाबसिंग वसावे, लक्ष्मण मिस्तरी, महेंद्र पाटील, किरण वसावे, अजय दिवटे, सुधीर त्रिभुवन, फुलसिंग वसावे आदी पस्थित होते.

LEAVE A REPLY

*