नागरिकांनी सर्व धर्मांचा आदर करावा! – अ‍ॅड.वळवी

0
मोदलपाडा । वार्ताहर- तळोदा शहरात व तालुक्यातील प्रत्येक नागरिक हा सुखी व समाधानी आहे. म्हणून या शहरात शांती आहे. म्हणून प्रत्येक नागरिकांनी सर्व धर्माचा आदर केला पाहिजे व हित संबंध जोपासले पाहिजे, असे प्रतिपादन माजीमंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी यांनी केले.

तळोदा येथील गणेश सोशल ग्रुपतर्फे सालाबादाप्रमाणे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अ‍ॅड.वळवी बोलत होते. अ‍ॅड.वळवी पुढे म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यात खरी समृद्धी तळोद्यात आहे. तळोदा शहरासारखी शांतता जिल्ह्यात व राज्यात राहावी असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक समाजाचा सण असेच उत्सव असेच साजरे करावीत की जेणेेकरून समाजामध्ये एकमेकांविषयी आपुलकी व गोडी निर्माण होईल.

मौलाना शोएब रजा नुरी म्हणाले, आम्हाला अभिमान आहे की आम्ही भारतीय आहोत. तळोद्यात गेल्या अनेक वर्षांपासून शांतता आहे, भारतात देखील अशीच शांतता नांदावी अखेरचा क्षण पावेतो देशावर प्रेम करत राहणार, देशावर प्रेम करणे म्हणजेच धर्मावर प्रेम करणे, सोशल मीडियावर अतिशय खोटे धार्मिक संदेश टाकले जात असून यावर विश्वस ठेवू नका, असे आवाहन केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक संजय माळी, उपाध्यक्ष नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, सचिव विकास राणे, सदस्य योगेश मराठे, संदिप परदेशी यांनी परिश्रम घेतले. यावेळी माजी क्रीडामंत्री पद्माकर वळवी, माजी नगराध्यक्ष भरत भाई माळी,

मौलाना शोयब रजा नूरी, नगरसेवक गौरव वाणी, सुभाष चौधरी, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश ठाकरे, पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे, निसार दादा मक्राराणी, अकबर शेख हिदायत, माजी नगरसेवक अरविंद पाडवी, अरविंद मगरे, प्रकाश कर्णकार, अरुण मगरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत सूर्यवंशी यांनी केले.

LEAVE A REPLY

*