शहादा येथे अल्पवयीन गतीमंद युवतीवर बलात्कार

0
नंदुरबार । शहादा येथील होळ मोहिदा येथील अल्पवयीन गतीमंद युवतीवर 50 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली. बलात्कारातून गर्भधारणा झालेल्या युवतीने चालत्या रूग्णवाहिकेत बाळाला जन्म दिला. याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करून नराधमाला तात्काळ अटक करण्यात आली आहे.

शहादा तालुक्यातील होळ मोहिदा येथे दिलीप अप्पा कोळी रा़ मालपूर ता़ शिंदखेडा याचे सातत्याने येणे-जाणे होत़े या दरम्यान त्याचे गावातील एका कुटूंबासोबत जवळीक निर्माण झाली़ कुटूंबातील सर्व सदस्य रोजगारासाठी शहादा परिसरात जात असल्याने घरी 15 वर्षीय गतीमंद बालिका एकटी रहायची़ याचा फायदा घेत दिलीप कोळी याने वर्षभर तिच्यावर बलात्कार केला़ यातून संबधित युवतीला गर्भधारणा झाली़ बदनामी आणि अशिक्षितपणा यातून तिच्या आई-वडीलांनी ही बाब कोणासही सांगितली नाही़

परंतू गेल्या दोन दिवसांपूर्वी युवतीला प्रसवकळा सुरू झाल्यानंतर जिल्हा रूग्णालयात घेऊन जात असताना तिने रस्त्यातच नवजात अर्भकाला जन्म दिला होता़ दोघांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर रूग्णालय प्रशासनाने पिडित युवतीच्या आईचा जबाब घेऊन तो पोस्टाद्वारे सोमवारी शहादा पोलीस ठाण्यात पाठवण्यात आला़ जबाबावरून दिलीप कोळी याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला़

उपविभागीय पोलीस अधिकारी एम.बी. पाटील यांनी रूग्णालयात भेट देत माहिती घेतली़ रात्री उशिरा दिलीप कोळी यास अटक करण्यात आली़ तपास उपविभागीय पोलीस अधिकारी एम.बी. पाटील करत आहेत़ कोळी याच्याविरोधात अनुसुचित जाती-जमाती सुधारित अधिनियम 2015 तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 सह इतर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल आह़े

LEAVE A REPLY

*