रोजा केल्याने मनाची स्वच्छता होते! – जिल्हाधिकारी

0
नंदुरबार । ईश्वर व अल्लाहच्या भक्तीने सकारात्मक उर्जा प्राप्त होत असते. पवित्र रमजानचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रोजा केल्याने शरीरासह मनाचीही स्वच्छता होत असते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले

नंदुरबार शहरात उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात बुधवारी सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत वाघूर्डे, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार,

पोनि. के.जी.पवार, पोनि संदीप रणदिवे, मुख्याधिकारी गणेश गिरी, मौलाना आरिफ रहेमानी, मौलाना नासीर पठाण, मौलाना अहेमद रजा उपस्थित होते. याप्रसंगी नगरसेवक फारूक मेमन, माजी नगरसेवक सफा पिंजारी, प्रवासी संघटनेचे गजेंद्र शिंपी, गजेंद्रसिंग राजपूत, अल्पसंख्यांक हक्क परिषदेचे डॉ.मतीन शेख, पप्पू कुरेशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रणजितसिंह राजपूत यांनी केले.

दरम्यान, शुक्रवारी चंद्र दिसल्यावर शनिवारी ईद साजरी होणार आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले रोजेदखील यानिमित्ताने संपणार आहे. ईदसाठीच्या खरेदीसाठी बाजारात मोठया प्रमाणावर गर्दी होत आहे. दररोज सायंकाळी रोजा सोडण्यासाठी लागणारे खाद्यपदार्थ खरेदीसाठी चौकाचौकात गर्दी होत आहे. खरेदीसाठी मुस्लिम समाजात रमजान ईदला विशेष महतव असते. त्यामुळे या दिवशी खरेदी केलेले नवीन कपडे परिधान करणे,

घराची साफसफाई करून सजावट करणे, नातेवाईकाना ईदसाठी आमंत्रित करणे आदी उपक्रम आयोजित करण्यात येतात. शनिवारी साजर्‍या होणार्‍या ईदच्या खरेदीसाठी बाजारात गेल्या आठवडयापासून मोठया प्रमाणावर गर्दी होत आहे. याशिवाय शुजची दुकाने, महिलांचे सौंदर्य प्रधान, सुगंधीत अत्तर, सुकामेवा, विशिष्ट प्रकारच्या शेवया यांचीही विक्री मोठया प्रमाणावर होत आहे.

LEAVE A REPLY

*