मोलगी येथे दोन गटातील महिलांना मारहाण

0
नंदुरबार । अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे दोन गटातील महिलांसह तुफान हाणामारी होऊन किराणा दुकानातील 25 हजार रुपयांसह महिलेच्या गळ्यातील 60 हजाराची चैन लंपास करून मारहाण केली. तर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन्ही गटातील सोळा जणांविरूद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मनिषा सोमनाथ ठोळे रा.शांतीनगर, मोलगी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ज्योत्सना सुभाष ठाकुर, सुभाष लोटन ठाकुर, शरद सुभाष ठाकुर, पुजा सुभाष ठाकुर, ललिताबाई बाबुलाल सुर्यवंशी, पुष्पा बाबुलाल सुर्यवंशी सर्व रा.मोलगी यांनी त्यांच्या घरात असलेल्या किराणा दुकानात घुसून त्यांना मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किंमतीच्या 2 सोन्याच्या चैन तसेच दुकानातील 25 हजार रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून नेली.

याप्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात सहाही जणांविरूद्ध भादंवि कलम 392, 323, 504, 143, 147, 149 व मुंबई पोलीस कायदा कलम 37(1)(3) चे उल्लंघन कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.

दरम्यान, अशीच प्रकारची फिर्याद कु.पुजा सुभाष ठाकुर रा.मोलगी ता.अक्कलकुवा हिने दिली असून त्यात म्हटले आहे की, सोमनाथ भगवान ठोळे, मनिषाबाई सोमनाथ ठोळे, नितीन सोमनाथ ठोळे, डिंपल सोमनाथ ठोळे, निशा सोमनाथ ठोळे, भिला भगवान ठोळे, लताबाई भिला ठोळे, महेश भिला ठोळे, प्रशांत भिला ठोळे, सुनिल भगवान ठोळे सर्व रा.मोलगी यांनी त्यांच्या घरात घुसून तिच्याशी धक्काबुक्की करून तिचा विनयभंग केला. तसेच पोटात लाथेने मारून दुखापत केली. तसेच शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी दहाही जणांविरूद्ध मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी एम.बी. पाटील करीत आहेत.

LEAVE A REPLY

*