युवक काँग्रेसतर्फे सदस्य नोंदणी

0
नंदुरबार । महाराष्ट्र युवक काँग्रेस कमिटीतर्फे ‘नेता बनना-नेता चुनना’ अभियानांतर्गत सदस्य नोंदणीची प्रक्रिया सुरु आहे. सदस्य नोंदणीनंतर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विधानसभा क्षेत्र अध्यक्षांची निवडणूक प्रकिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती नाशिक विभागाचे प्रभारी मनोज सहारन यांनी दिली.

श्री.सहारन म्हणाले, युवक काँग्रेसच्या नुतन कार्यकारीणीची निवड प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. यानिमित्त दि. 11 जूनपासून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम, प्रभारी प्रतिभा रघुवंशी यांच्या हस्ते सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

9 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे सदस्य नोंदणी अभियान ऑफलाईन तसेच ऑनलाईन पद्धतीने करण्याची मुदत आहे. यासाठी युवक काँग्रेसचा सदस्य 18 ते 35 वयोगटातील असणे आवश्यक आहे. एकेका सदस्याला चार सदस्य जोडावयाचे आहेत. त्यामुळे पाच सदस्य झाले तरच त्या सदस्याची नोंदणी होणार आहे.

सदर नोंदणी ऑफलाईन म्हणजे अर्ज भरुन करता येणार आहे. तर ऑनलाईन पद्धतीनेही अ‍ॅपद्वारे सदस्याला नोंदणी करता येणार आहे. 9 जुलैपर्यंत नोंदणी पूर्ण झाल्यानंतर फक्त ऑनलाईन पद्धतीने 11 जुलैपर्यंत सदस्याला नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष यांची निवडणूक घेण्यात येणार आहे. यापुर्वी लोकसभा क्षेत्र अध्यक्षाची निवड करण्यात येत होती.

आता जिल्हानिहाय जिल्हाध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे सदस्यांनाच नेता बनता येणार आहे आणि त्यांनाच नेता निवडता येणार आहे. जिल्हाध्यक्ष निवडतांना खुले, अनसुचित जाती, अनुसूचित जमाती तसेच इतर कार्यकारीणी सदस्यांमध्येही महिला, ओबीसी, एससी, एस.टी असे आरक्षण राहणार आहे.

विधानसभा क्षेत्र अध्यक्ष व प्रदेशाध्यक्षाचे पद खुले असून कार्यकारीणीतील इतर सदस्यांसाठी वेगवेगळे आरक्षण राहणार आहे. त्यामुळे सर्व पदाधिकार्‍यांची निवड ही अत्यंत पारदर्शकपणे व ऑनलाईन होणार आहे, असेही श्री.सहारन म्हणाले. यावेळी नगरपालिकेचे सभापती कुणाल वसावे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*