अक्कलकुवा औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात कार्यशाळा

0
अक्कलकुवा । दि.02 । प्रतिनिधी-येथील अली अल्लाना औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात रियुनीयन कार्यशाळा घेण्यात आली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे देशातील क्लिनीकल रिसर्च आणि फार्मा रेग्युलेटरी अफेअर्समध्ये पार्टटाईम सर्टीफिकेट कोर्स सुरू करणारे पहिले विद्यापीठ ठरले आहे.
क्लिनीकल रिसर्च आणि फार्मा रेग्युलेटरी अफेअर्स क्षेत्राचे महत्व वाढले आहे. नवीन औषधांबरोबरच जेनेरीक औषधांसाठीसुद्धा शासनाने क्लिनीकल संशोधन सक्तीचे केल्यामुळे क्लिनीकल रिसर्च क्षेत्रालाही खुप मागणी आहे.
विज्ञान शाखेत व औषधनिर्माण शाखेत अभ्यास करण्याच्या विद्यार्थ्यांना सर्टीफिकेट कोर्सच्या माध्यमाने फार्मा रेग्युलेटरी अफेअर्स आणि क्लिनीकल रिसर्च क्षेत्रातील अत्यंत महत्वाच्या गुणांचे प्रात्यक्षिकाद्वारे सराव करण्यास वाव मिळेल.

ज्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगार विषयक संधी जास्तीत जास्त मिळतील, असे प्राचार्य खान यांनी सांगितले.
अली अलाना औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात नुकतीच एकदिवसीय कार्यशाळा व चर्चासत्र पार पडले.

या चर्चासत्रामध्ये प्रथम उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मान्यताप्राप्त सर्टिफिकेट कोर्सचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी प्राचार्य डॉ.जी.जे.खान यांनी प्रास्ताविकादरम्यान मान्यताप्राप्त सर्टिफिकेट कोर्सचे महत्व सांगून हा कोर्स त्यांच्या विशेष प्रयत्नाने विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून अली अलाना औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात सुरू झालेला असून उमविअंतर्गत चतुर्थ वर्ष औषधनिर्माणशास्त्राचे बी.एस्सी. आणि एम.एस्सीचे विद्यार्थी याचा लाभ घेवून शकतात.

तसेच चर्चासत्रासाठी सी.डी.एस.सी.ओ. दिल्लीचे ड्रग्ज इन्स्पेक्टर शोएब खान यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील स्पर्धा परिक्षा व नवनवीन कोर्सेसची सुंदर माहिती दिली. याबरोबर अमृत कर्माकर, डायरेक्टर इंनक्लीनीशन यांनी औषधशास्त्र व औषधनियामक यावर प्रकाश टाकला असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

तसेच डॉ.प्रविण पाटील, मोहनीश विसपुते यांनी फार्माकोन्हीजीलन्स या क्षेत्रातील संधी आणि साहिल खान यांनी क्लिनीकल रिसर्च याविषयी महत्वाचे मुद्दे मांडले. कार्यक्रमासाठी नंदुरबार-शहादा येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन राहील खान यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जामिया शैक्षणिक संकुलाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

व्यावसायिक सर्टिफिकेट कोर्समुळे विद्यार्थ्यांना नोकरीची संधी तर मिळेलच याव्यतिरिक्त त्यांचे भविष्य उज्वल होण्यास मदत होईल. या दोन्ही कोर्सचे केंद्र जामिया संचलित अली अल्लाना औषधनिर्माणशास्त्र अक्कलकुवा येथे असणार असल्याचे सांगितले आहे.

 

LEAVE A REPLY

*